योगामुळे शरीर आणि मन दोन्ही नेहमी प्रसन्न राहते. योगामधील आसनं, प्राणायम आणि ध्यानधारणा आरोग्य आणि मुळात आपलं ह्रदय चांगलं राखण्यासाठी मदत होते. ह्रदय चांगलं राहण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे.
- तणावापासून मुक्तता
रोजच्या तणावापासून मुक्त राहायचं असल्यास रोज दिवसातून काही वेळ योगा करावा. ध्यानधारणेमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. योगाच्या सरावामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. ध्यानामुळे तुम्हाला शांत राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयावर ताण येत नाही.
- वजन कमी होते
दररोज योगा केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. योगामधील आसनांमुळे शरीरातील स्नायूंवर योग्य दबाव येऊन वजन कमी होऊन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र त्यासाठी रोज योगा करणे गरजेचे आहे. वजन कमी झाल्यावर आपोआप हृदयावर येणारा भार कमी होतो. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होतात.
- धुम्रपान रोखते
धुम्रपान हे हृदयाचे मुख्य कारण आहे. रोज योगा केल्यामुळे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धुम्रपान सोडण्यासाठी मदत होते. बरेच लोक तणावात असल्यानंतर धुम्रपान करतात. पण योगामुळे ताण कमी होतो त्यामुळे धुम्रपान सोडणं शक्य होतं.
- रक्तदाब कमी होण्यास मदत
नियमित योगा केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे रक्तदाब देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआप हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते. योगातील काही आसन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणदेखील आपोआप कमी होऊन हृदयावर दबाव येत नाही.
- हृदयाची काळजीसाठी उपयोगी
उच्च रक्तदाब, ताणतणाव यापासून मुक्त होण्यासाठी योगाचा उपयोग होतो. दिवसातून साधारण 40 मिनिटे योगा केल्याने हृदयाची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. शरीरातील रक्तप्रवाह नीट होऊन आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
हेही वाचा :