Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीYoga Mantra : फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी करा ही योगासने

Yoga Mantra : फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी करा ही योगासने

Subscribe

बदलती लाइफस्टाइल, चुकिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे कित्येक महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. ज्यामुळे अनेक स्त्रियांना आई होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत महिलांनी योगा करणे फायद्याचे ठरेल. विशेषत: ज्या महिलांना गर्भधारणा होण्यास अडचणी येत आहेत अशा महिला योगाच्या मदतीने त्यांची प्रजनन क्षमता वाढवू शकतात. तसेच योगाच्या मदतीने गर्भाशयही निरोगी राहते. त्यामुळे जाणून घेऊयात, अशी योगासने जी फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतील.

भुजंगासन –

  • योगा मॅटवर पोटावर झोपून घ्या.
  • आता हातांवर दाब देत पाठीमागे ताणून शरीराचा वरचा भाग उचलण्याचा प्रयत्न करा.
  • 10 ते 15 सेकंद याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.
  • 10 ते 15 सेकंदानंतर पुन्हा याच स्थितीत या.

भ्रामरी प्राणायाम –

  • भ्रामरी प्राणायाम करताना आरामात बसून घ्या आणि डोळे बंद करून घ्यावेत.
  • आता अंगठ्याने कान बंद करा.
  • यानंतर तर्जनी भुवयांवर ठेवा आणि इतर बोटांनी नाक दाबून घ्या.
  • आता श्वास घेण्याचा प्रयत्न करा.
  • हीच कृती 10 ते 15 वेळा करा.

पश्चिमोतासन –

  • योगा मॅटवर पाय लांब करून बसून घ्या.
  • आता हातांनी पायाचे तळवे पकडण्याचा प्रयत्न करा.
  • पायांचे तळवे पकडताना गुडघे वाकवू नका.
  • यानंतर खांदे वाकवा आणि कोपराने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
  • काही वेळ याच आसनात बसून राहा आणि पुन्हा पुर्वस्थितीवर परत या.

चक्की चालनासन -yoga

  • चक्की चालनासन करण्यासाठी चटईवर पाय पसरवून झोपा.
  • यानंतर दोन्ही पाय एकमेकांपासून लांब पसरवा.
  • दोन्ही हातांची बोटे आता गुंफवून घ्या.
  • आता चक्की जशी फिरते तसे तुम्हाला हात ठेवून फिरायचे आहे.
  • फक्त हे आसन करताना तुमचे कोपरे वाकणार नाहीत याची काळजी घ्या.
  • तसेच हात मागे नेताना स्वत: वाका हातांना वाकवू नका.

भुजंगासन, पश्चिमोतासन, चक्की चालनासन आणि भ्रामरी प्राणायाम व्यतिरीक्त तुम्ही फर्टिलीटी बूस्ट करण्यासाठी सुप्तबद्ध कोणासन, उत्कट कोणासन, गुप्त पद्मासन अशी आसने करू शकता.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini