Wednesday, April 24, 2024
घरमानिनीयोगासनांनी वाढवता येणार आता प्रजनन क्षमता, 'हे' आठ योगा नक्की ट्राय करा!

योगासनांनी वाढवता येणार आता प्रजनन क्षमता, ‘हे’ आठ योगा नक्की ट्राय करा!

Subscribe

Yoga for fertility | गर्भधारणेचा प्रयत्न करणार्‍या महिलांसाठी, या योगाभ्यास फायदेशीर आहे कारण ते शरीर मजबूत करू शकतात आणि गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात.

– डॉ. माधुरी रॉय

Yoga for fertility | तणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजेच वंध्यत्व. अनेक जोडपी सतत प्रयत्न आणि वैद्यकीय उपचार करूनही गरोदर राहण्यास असमर्थ ठरतात. या समस्येवर मात करण्यासाठी योगाभ्यास करणे फायदेशीर ठरते.

- Advertisement -

योगाभ्यासामुळे तणाव आणि नैराश्यावर मात करण्यास मदत होते, या दोन्ही गोष्टी वंध्यत्वाशी संबंधित असतात. तणावामुळे तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कॉर्टिसोल तयार होतो, जो तुमच्या पुनरुत्पादक अवयवांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. काही ठराविक योगप्रकार कोर्टिसोलची पातळी देखील कमी करतात. आणि संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करू शकतात. गर्भधारणेचा प्रयत्न करणार्‍या महिलांसाठी, या योगाभ्यास फायदेशीर आहे कारण ते शरीर मजबूत करू शकतात आणि गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात.

उत्तान शिशुसन

uttan shishusana
Photo – Google

याला एक्स्टेंडेड पप्पी पोझ (Extended puppy pose) म्हणूनही ओळखले जाते, हे एक आरामदायी योगासन आहे.
तुमच्या गुडघ्यावर बसा. तुमचे पाय एकमेकांना समांतर असल्याची खात्री करा. हात सरळ पुढे पसरवा. यास्थितीत कपाळ जमीनीला स्पर्श करताना हात पुढे असायला हवेत. दीर्घ श्वास घेऊन पूर्वस्थितीत या. हे आसन एक ते दीड मिनिट स्थिर करावं. श्वास घेत पूर्व स्थितीत येऊन आसन सोडावं.

- Advertisement -

सूर्यनमस्कार

surya namaskar
Photo – Google

सूर्यनमस्कारामध्ये शरीरातील रक्ताभिसरण सुधारणाऱ्या आसनांची मालिकाच आहे. सूर्यनमस्काराचा नियमित सराव स्त्रियांना अनियमित मासिक पाळीसाठी उपयोगी आहे. पुढे बाळंतपणात त्यामुळे त्रास कमी होतो. याशिवाय सूर्यनमस्कारामुळे शरीरातील लैंगिक क्रियाही सुधारतात. आपले शरीर लवचिक बनवण्यासाठी आणि ओटीपोटाच्या भागातील समस्या कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरत आहे.

भ्रामरी प्राणायाम

bhramari pranayam
Photo – Google

भ्रामरी प्राणायाम या आसनामुळे तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारते. याशिवाय यामुळे तुम्हाला तणावापासून सुद्धा सहज मुक्ती मिळते. मन शातं असल्यास गर्भधारणेत मदत होते. हे आसन शरीरातील इतर अवयव योग्यरीत्या काम करण्यासाठी मदत करते.

मंडुकासन

Mandukasana
Photo – Google

वज्रासनमध्ये बसून आपली मुठी आपल्या नाभीजवळ आणा. मुठी नाभी आणि मांडीजवळ उभ्या ठेवा, हे करताना लक्षात घ्या की बोटं तुमच्या पोटाकडे आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना पुढे वाकून छाती मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. वाकताना, नाभीवर जास्तीत जास्त दबाव असतो. डोके आणि मान सरळ ठेवा आणि हळू हळू श्वास घ्या आणि श्वास सोडा. या आसनामुळे प्रजनन अवयवांमधील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.

सुप्त बद्ध कोनासन

supta baddha
Photo – Google

सुप्त बद्ध कोनासन किंवा रीक्लिनिंग बाउंड अँगल पोज शरीराला बळकटी देणाऱ्या रिस्टोरेटिव्ह योगा पोझच्या श्रेणीमध्ये येतात. या योगासनांमुळे योगींच्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते, मज्जासंस्था बळकट होते. हे आसन आपल्या हिप्सच्या भागांना उघडण्याचे काम करते. याशिवाय हे मांड्यांच्या आतील स्नायूंवरही काम करते. त्यामुळे पोट फुगणे आणि तणाव या समस्याही दूर होतात.

बालासन

बालासन योगासन - Balasana Yoga
Photo – Google

गुडघ्यांवर बसा आणि डोकं जमिनीवर टेका. तुमच्या टाचा हिप्सना टच करू द्या. पुढच्या बाजूला स्ट्रेच करून तुमचे हात डोक्याच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करा. श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. बालासन ताण दूर करण्यास आणि रक्त प्रवाह सुरळीत करण्यात मदत करतं जे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे आसन रिकाम्या पोटी करावे किंवा भोजनाच्या किमान चार ते सहा तासानंतर करावं.

भिंतीवर पाय सरळ ठेवणे

या आसनामुळे फेलोपियन ट्यूबचा भाग मोकळा व्हायला सुरुवात होते. हे आसन करण्यासाठी जमिनीवर झोपा, दोन्ही पाय भिंतीवर ठेवा. गुडघ्यांमध्ये 90 अशांचा कोन असू द्या. जोपर्यंत सहजरित्या या स्थितीत थांबता येईल, तेवढा वेळ थांबा. एका मिनिटाच्या आसनापासून या व्यायामाला सुरुवात करू शकता.

योनी मुद्रा

yoni mudra
Photo – Google
  • यासाठी सुखासन किंवा वज्रासनात बसावे.
  • तुमचे खांदे वर करून किंवा भिंतीवर सरळ बसून तुमचा पाठीचा कणा सरळ करा.
  • आपला हात अशा प्रकारे वाकवा की तो गर्भासारखा आकार तयार करेल. आपले दोन्ही हात वर करा आणि अंगठे कानाजवळ ठेवा. त्यानंतर तर्जनी तुमच्या डोळ्यांवर आणि मधले बोट नाकाच्या बाजूला आणि अनामिका ओठांच्या वरच्या भागावर ठेवा.
  • तसेच करंगळी ओठांच्या खालच्या भागावर ठेवा.
  • नाकातून श्वास घेताना दोन्ही नाकपुड्या मधल्या बोटाने बंद करा.आपल्या क्षमतेनुसार श्वास रोखून ठेवा आणि काही वेळाने ऊँ चा उच्चार करताना हळूहळू श्वास सोडा.
  • हळूहळू जुन्या स्थितीत परत या. या मुद्रेचा सराव महिलांसाठी उत्तम व्यायाम मानला जातो.
  • हे हार्मोनल असंतुलन नियंत्रित करते आणि परिणामी स्त्रीच्या पुनरुत्पादक प्रणालीचे इष्टतम कार्य होते.

 (लेखिका पुण्यातील कन्सिव्ह आयव्हीएफ येथे स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत.)

- Advertisment -

Manini