Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyखाण्याच्या सोड्याचा असाही करू शकता वापर

खाण्याच्या सोड्याचा असाही करू शकता वापर

Subscribe

स्वयंपाक घरात अनेकदा खाण्याच्या सोड्याचा वापर केला जातो. कधी इडली बनवण्यासाठी तर कधी केक बनवण्यासाठी असो. सोड्यामुळे पदार्थ हलके, लुसलुशीत व्हायला मदत होते. पण, खाण्याचा सोडा मर्यादित स्वरुपात वापरणं गरजेचं आहे. पदार्थांव्यतिरिक्त सोड्याचा वापर इतरही अनेक गोष्टींसाठी तुम्ही करु शकता.

We All Love Baking Soda, but Where Does It Come From?

- Advertisement -
  • कोंडा झाल्यास

केसात कोंडा झाल्यास काही दिवस केसाला शॅम्पू न लावता खाण्याचा सोडा केसांच्या मुळाशी लावून केस धुतल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

  • केसांना चमक येते

खाण्याच्या सोड्याने केसांना तसेच त्वचेला चमक येते. आंघोळीच्या पाण्यात अर्धा कप खाण्याचा सोडा टाकून या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. विशेष म्हणजे कंडीशनरमध्ये खाण्याचा सोडा मिसळून केस धुतल्याने केसांची चमक वाढण्यास मदत होते.

- Advertisement -

20 Ingenious Uses for Baking Soda Around the House - Bob Vila

  • दातांचा पिवळेपणा

आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी खाण्याचा सोडा अतिशय उपयुक्त आहे. यासाठी थोड्या पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून बोटाने हळूहळू दातांवर मसाज करुन नंतर तोंड स्वच्छ धुतल्याने दातांवरील पिवळेपणा कमी होतो.

  • ब्लॅकहेड्सची समस्या

जर कोणाला ब्लॅकहेड्सची समस्या असल्यास खाण्याच्या सोबड्यात थोडं पाणी मिसळून घ्या. ही तयार पेस्ट ब्लॅकहेड् असलेल्या जागी लावून 15 मिनिटानंतर गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हे नियमित केल्याने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

  • ब्लॅक अंडरआर्म्स कमी करण्यासाठी

ब्लॅक अंडरआर्म्स दूर करण्यासाठी खाण्याचा सोडा पाण्यात भिजवून त्याठिकाणी लावा. 5 मिनिटांनी तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवडाभर हा उपाय नियमित केल्यास फरक जाणवेल.

 


हेही वाचा :

ब्लॅक अंडरआर्म्सने त्रस्त आहात? ‘हे’ करा उपाय

- Advertisment -

Manini