थंडीच्या दिवसात रुक्ष त्वचेला कोमल करण्यासाठी पेट्रोलिअम जेलीचा वापर केला जातो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पेट्रोलियम जेलीचा वापर अन्य कारणांसाठीही करता येतो. तर जाणून घेऊयात पेट्रोलियम जेलीचे इतर फायदे.
- टाचांच्या भेगांपासून सुटका
थंडीच्या दिवसांमध्ये तसेच सतत पाण्यात काम केल्याने टाचांना भेगा पडून टाचा रुक्ष होतात. अशावेळी स्वच्छ पाण्याने पाय धुवावेत त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने पाय कोरडे करून त्यानंतर टाचांना पेट्रोलियम जेली लावावी. काही दिवसांनी टाचा मुलायम होतात.
- डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी
डोळ्यासारख्या नाजूक अवयवाचा मेकअप उतरवताना काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कॉटनच्या बोळ्यावर पेट्रोलियम जेली घेऊन अलगद डोळ्यांचा मेकअप काढा.
- हेअरडाय, नेलपॉलिश पासून त्वचा सांभाळण्यासाठी
केसांना हेअर डाय लावताना किंवा नखांना नेलपॉलिश लावताना रंग त्वचेला लागून त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी डोक्याभोवती किंवा नखांभोवती पेट्रोलियम जेली लावल्यास त्वचेवरील रंग काढण्यास मदत होते.
- पाळीव प्राण्यांच्या पंजांसाठी
घरातील पाळीव प्राण्यांच्या पंजांची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा उपयोग होऊ शकतो. पाळीव प्राण्यांचे पंजे कापसाने स्वच्छ कोरडे करून त्यानंतर पेट्रोलियम जेली लावा.
हेही वाचा :