Monday, January 20, 2025
HomeमानिनीKitchen Tips : फ्रिजमध्ये खाद्यपदार्थच नाही तर ठेवू शकता या गोष्टी

Kitchen Tips : फ्रिजमध्ये खाद्यपदार्थच नाही तर ठेवू शकता या गोष्टी

Subscribe

आपल्या स्वयंपाकघरातील फ्रिज हा महत्वाचा भाग आहे . फ्रीजमुळे आपलं काम अधिक सोपे होते . आपण बऱ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो. भाज्या फळे आणि खाद्यपदार्थ स्टोअर करण्यासाठी फ्रिज उत्तम आहे. आपल्या स्वयंपाकघरात फ्रिज नसेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्याचबरोबर फ्रिजशिवाय स्वयंपाकघर देखील अपूर्ण आहे. खाण्या-पिण्याबरोबरच अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्यांची गुणवत्ता टिकून राहू शकते.तुम्हाला माहिती आहे का ? खाद्यपदार्थ व्यतिरिक्त तुम्ही या वस्तू देखील फ्रिजमध्ये ठेवू शकता. आज आपण जाणून घेऊयात खाद्यपदार्थ व्यतिरिक्त कोणत्या वस्तू आपण फ्रिजमध्ये ठेवू शकतो.

आय प्रोडक्टस

डोळ्यांसाठी वापरले जाणारे प्रोडक्टस आपण फ्रिजमध्ये निश्चितपणे ठेवू शकताे. हे प्रोडक्टस दीर्घकाळ टिकून राहतील आणि खराब देखील होणार नाही. क्रीम लोशन फ्रिजमध्ये ठेवून डोळ्यांवर लावल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळे अधिक फ्रेश दिसतील तसेच डोळ्यातील लालसरपणा देखील निघून जाईल.

लिपस्टिक

बऱ्याचदा महागड्या लिपस्टिक तापमानामुळे लगेच खराब होतात. अशावेळी तुम्ही या लिपस्टिक फ्रिजमध्ये ठेवू शकता. फ्रिजमध्ये स्टोअर केल्याने त्या खराब देखील होणार नाही. लिपस्टिकचा रंग देखील फिकट होणार नाही.

पूजेची फुले

बाजारातून फुले खरेदी केल्यानंतर २ ते ३ दिवसांनी फुले लगेच खराब होतात. फुल ५-६ दिवस टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये फुले स्टोअर करू शकता.

परफ्यूम

तुम्ही परफ्यूम देखील फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. उन्हाळयात खोलीचे तापमान वाढत अशावेळी परफ्यूम लवकर खराब होतो. परफ्यूम खराब होऊ नये यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये परफ्यूम ठेवू शकता.

नेलपॉलिश

नेलपॉलिश चांगल्या दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही त्या फ्रिजमध्ये ठेवू शकता. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या खराब आणि सुकणार देखील नाही.

हेही वाचा : Health Tips : थंडीत हातापायांची बोटं का सुजतात? ही आहेत कारणे


Edited By : Prachi Manjrekar

 

 

Manini