नात्यात विश्वास जितका महत्वाचा तितकाच महत्वाचा असतो जिव्हाळा, काळजी आणि प्रेमबंध. या तीन पैकी एकाची जरी नात्यात कमतरता असेल तर ते नातं कधी फुलत नाही. त्यामुळे असं नात जगताना त्यात तुम्हाला आनंद मिळत नाही परिणामी तुम्ही कधीच आनंदी नसता. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण व्यक्तीमत्वावर होतो आणि त्यात तुमचं चैतन्यचं कोमजून जातं. पण जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल जो तुमची काळजी तर घेतोच शिवाय तुमच्यावर भरभरुन प्रेम करत असेल, तुमच्या भावनांचे महत्व ज्याला कळतं असेल तर तुम्ही कायम चिरतरुण दिसता.
कारण तज्ज्ञांच्या मते असं नातं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे तुम्ही सतत आनंदी असता आणि दिसता. कोणत्याही नात्यात जिव्हाळा महत्त्वाचा असतो. नात्यात जवळीक केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिक देखील असू शकते.
चांगले संबंध तुम्हाला तरुण ठेवतात
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, “नात्यातील जवळीक मेंदूमध्ये सकारात्मक विचारांना चालना देते, म्हणूनच अनेक जण नवीन नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या दिवसांचा आनंद घेतात. आनंदी नात्यात सकारात्मक प्रतिक्रिया मिळते, ज्यामुळे डोपामाइन वाढते. ही अशी रसायने आहेत जी ऊर्जा आणि फोकस वाढवतात. त्यामुळे अशा नात्यातील व्यक्ती कायम आनंदी असतात.
तणाव आणि चिंता कमी करते
कोणत्याही नातेसंबंधात, जोडीदाराकडून भावनिक आधार आणि शारीरिक स्पर्श सुरक्षेची भावना निर्माण करतो.
मूड सुधारते
ज्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला आनंद मिळतो त्या व्यक्तीबरोबर आपण आनंदी असतो. त्यामुळे मूडही सुधरतो.
आत्मविश्वास वाढतो
जेव्हा तुम्ही जिव्हाळ्याच्या नात्यात असता तेव्हा तुमचा आत्मविश्वासही वाढतो.
संवाद सुधारतो
कोणत्याही निरोगी नात्याची गुरुकिल्ली म्हणजे संवाद. त्यामुळे नातेसंबंधात मोकळा संवाद असल्यास भावनांचीच नाही तर विचारांचीही देवाणघेवाण होते. यामुळे एकमेकांना समजून घेण्यास वेळ मिळतो.
मानसिक समस्या नाही
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक शेअर केली तर तुमचे मानसिक आरोग्य सुधारते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक समस्यांचा धोका नाही. जेव्हा तुम्ही आंतरिक आनंदी असता तेव्हा चिंता, तणाव आणि नैराश्य इत्यादी समस्या उद्भवत नाहीत. निरोगी मानसिक आरोग्य निरोगी शरीराची निर्मिती करते.