Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthखाण्याच्या 'या' सवयीमुळे वाढते फॅटी लिव्हर रिस्क

खाण्याच्या ‘या’ सवयीमुळे वाढते फॅटी लिव्हर रिस्क

Subscribe

हेल्थी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव व्यवस्थितीत काम करणे अत्यंत गरजेचे आहे. लिवर शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करते आणि फॅटला फॅटी अॅसिडमध्ये तोडण्यास मदत करतात. त्यामुळे डाइजेशनसाठी खुप मदत होते.

मात्र कधीकधी लोक फॅटी लिवरच्या समस्येमुळे त्रस्त असतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लिव्हरमध्ये फॅट बिल्डअप होते. हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते आणि तुम्हाला काही प्रकारच्या आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु तुम्हाला माहितेय का, फॅटी लिव्हर मध्ये रिस्क वाढवण्यासाटी तुमची खाण्याची सवय सुद्धा जबाबदार असू शकते. लिव्हर आणि डाइजेशन सिस्टिमचा थेट संबंध आहे. त्यामुळे तुमची खाण्याची सवय अयोग्य असेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

मील्सला स्किप करणे
काही वेळेस लोक मील्स स्किप करतात. तर कधीकधी कामाच्या नादात अथवा काही कारणास्तव मील स्किप करणे अत्यंत नुकसानदायक ठरू शकते. तुम्ही खुप वेळ खात नाहीत किंवा मील्स स्किप करतात त्याचा मेटाबॉलिज्मवर नकारात्मक परिणाम होतो.

पुरेशा प्रमाणात प्रोटीन न घेणे
प्रोटीन शरीरात फार महत्त्वाची भुमिका निभावतात. मात्र डाएटमध्ये आपल्या शरीराच्या गरजेनुसार पुरेसे प्रोटीन घेत नाहीत, त्यामुळे तुमच्या मसल्सवर वाईट परिणाम होतो. ऐवढेच नव्हे तर यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ लागते. अशातच तुम्ही आपल्या डाएटमध्ये पोल्ट्री, मासे यांचा समावेश करावा.

- Advertisement -

अधिक फास्ट फूड खाणे
मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला फास्ट फूड खाणे आवडते. मात्र यामध्ये अनहेल्दी फॅट्स ते शुगर, कॅलरीज असतात. त्यामुळे जी लोक अधिक फास्ट फूड खातात ते केवळ लठ्ठपणा नव्हे तर फॅटी लिव्हरचा सुद्धा समस्येचा सामना करतात.

पाकिटबंद फूड खाणे
बहुतांशजणांना पाकिटबंद फूड खाणे आवडते. यामुळे फॅटी लिव्हरची रिस्क वाढली जाते. मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये लोक रेडी टू ईट किंवा पाकिटबंद फूड खाणे पसंद करतात. कारण यामध्ये फारशी मेहनत करत नाही. अशातच फूड्समुळे सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते.


हेही वाचा- ओव्हरईटींगची ‘ही’ आहेत कारणे

- Advertisment -

Manini