घरलाईफस्टाईलअपूर्ण झोपेमुळे तुमच्या डोळ्यांनाही करावा लागू शकतो 'या' समस्यांचा सामना

अपूर्ण झोपेमुळे तुमच्या डोळ्यांनाही करावा लागू शकतो ‘या’ समस्यांचा सामना

Subscribe

डॉक्टरांकडून आपल्याला दिवसातून किमान 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. अनिद्रा किंवा झोप न येणे यामुळे अनेकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.

अपूर्ण झोपेमुळे अनेकांच्या डोळ्याखाली काळसर डाग दिसतात. तसेच डोळे सूजने यांसारख्या समस्या सुद्धा दिसून येतात. तसेच झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर शरीरामध्ये सुस्ती आणि पोटामध्ये जडपणा निर्माण होतो. त्यामुळे भरपूर झोप आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते. डॉक्टरांकडून आपल्याला दिवसातून किमान 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. अनिद्रा किंवा झोप न येणे यामुळे अनेकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय यासोबतच अनेकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.

अपूर्ण झोपेमुळे होऊ शकतात ‘या’ समस्या

- Advertisement -

  • डोळ्यांमध्ये थकवा
    अपूर्ण झोपेमुळे तुम्हाला सतत डोळ्यांमध्ये थकवा जाणवू शकतो. अशावेळी तुम्हाला सतत झोप आल्यासारखे होऊ शकते.
  • डोळे कोरडे पडणे
    अपूर्ण झोपेमुळे तुमचे डोळे कोरडे पडू शकतात. शिवाय यामुळे तुम्हाला सतत डोळ्यांमध्ये काहीतरी टोचत असल्यासारखे देखील वाटते.
  • अस्पष्ट दिसणे
    अपूर्ण झोपेमुळे तुमची नजर कमजोर होऊ शकते.

डोळ्यांच्या आजारापासून वाचण्याचे उपाय

- Advertisement -

  • ध्यान आणि योगा करा.
  • डोळ्यांचा व्यायाम करा.
  • दिवसातून कमीत कमी 7 तास झोप घ्या.
  • पौष्टिक आहाराचे सेवन करा.
  • गाजर, बीट यांचा आहारात समावेश करा.
  • टी.व्ही, मोबाईल आणि फोनचा कमी वापर करा.
  • सतत थंड पाण्याने डोळे स्वच्छ करा.

हेही वाचा :

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे शरीरावर दिसतात ‘ही’ पाच लक्षणं; वेळीच ओळखा नाहीतर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -