घरलाईफस्टाईलतुमचा सोशल नेटवर्क हाच मद्यसेवनाच्या सवयींशी निगडित असतो, सर्वेक्षणातील निष्कर्ष

तुमचा सोशल नेटवर्क हाच मद्यसेवनाच्या सवयींशी निगडित असतो, सर्वेक्षणातील निष्कर्ष

Subscribe

मद्यपान करण्यास कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींवर संपूर्ण लक्ष केन्द्रित होते. आणि त्वरित त्यांच्या वर्तणूकीत बद्दलाव येतो असे संशोधनात आढळले आहे. 

हेल्थ अँड प्लेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, अनेक लोकांमध्ये त्यांचा समाजातील इतर  लोकांशी असलेला सामाजिक संबंध हा त्यांच्या मद्यसेवनाच्या सवयशी निगडीत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. अगदी मिश्किल आणि सोप्प्या शब्दात याचा अर्थ मांडायचे झाल्यास. ”ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला” ही म्हण वापरता येईल. हा झाला मस्करीचा भाग. पण अनेक विद्यापिठाच्या संशोधनानुसार तसेच Santa Monica मधील RAND कार्पोरेशन, इंडियाना युनीवर्सिटी चे संशोधनकर्ता हंक ग्रीन (Hank Green) याच्या परिक्षणानुसार माणसाचा त्याच्यामद्यसेवनाच्या सवयीवर कशा प्रकारे त्याच्या सभोवतालची स्थिति आणि सामाजिक वावर किंवा संबंध निगडीत आहे याचे विश्लेषण केलं आहे. तसेच हंक ग्रीन (Hank Green) आणि त्यांच्या सह लेखकास असे निदर्शनास आले आहे की दोन प्रौढ व्यक्तींच्यामद्यसेवनाचे  प्रमाण हे किती असते तसेच एकमेकांचा कश्या प्रकारे संबंध आढळून येतो हे देखील सांगण्यात आले आहे. हेल्थ अँड प्लेस या जर्नलमध्ये हा सर्व अभ्यास डायरेक्ट अँड पबमेडमध्ये अनुक्रमित करण्यात आला आहे.मद्यपान करणार्‍या व्यक्तींच्या  सहवासात असलेल्या लोकांमध्ये राहणारे लोक एकमेकांना शोधत असतात आणि याउलटपक्षी त्यांच्या विरुद्ध मत असणार्‍या विचारभावना असणार्‍या लोकांशी ते दुरावा साधण्याचा प्रयत्न करतात” असं सह-लेखकाने नमूद केले आहे.


ग्रीन म्हणाले की हा अभ्यासक्रम संज्ञानात्मकरित्या तसेच लोकांच्या वर्तणूकीची पद्धतींना माहिती देण्यास मदत करू शकतो कारण अशा सवयीमुळे मद्यसेवन करणार्‍या लोकांना आणि ठिकाणांना ओळखण्यावर त्यांचे वारंवार लक्ष केंद्रित होत असते . यामुळे त्यांच्यात बादलाव होऊन मद्यपान करण्यास कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींवर संपूर्ण लक्ष केन्द्रित होते. आणि त्वरित त्यांच्या वर्तणूकीत बद्दलाव येतो असे संशोधनात आढळले आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – कॅन्सर रुग्णांनी कोरोना लस घेण्याआधी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -