घरटेक-वेकतरुणाईला जेवणापेक्षा फोन प्यारा!

तरुणाईला जेवणापेक्षा फोन प्यारा!

Subscribe

एका अभ्यासात असे समोर आले की जेवणापेक्षा त्यांना फोन खूप गरजेचा आहे

कॉलेज आणि तरूणाईला जेवणापेक्षा स्मार्टफोन प्यारा आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘अॅडिक्टिव्ह बिहेविअर’ या जर्नलमध्ये हा अभ्यास सादर करण्यात आला आहे. यूएस मधील बफेलो विद्यापीठात हा पार पडला. या अभ्यासादरम्यान त्यांनी मुलांना फोन आणि जेवण या दोन्हीपासून काही काळ दूर ठेवले. आणि काही काम केल्यानंतर त्यांना ते परत मिळणार होते. यावेळी विद्यार्थी फोनसाठी खूप कष्ट करताना दिसले. मात्र, तेवढे ते त्यांच्या आवडत्या पदार्थासाठी करताना दिसले नाहीत.

मुलं म्हणाली जेवण नको, फोन द्या!

सध्या फोन आणि सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला ५ वरून आता ९ तासांवर स्मार्टफोनचा वापर गेला आहे. १८ ते २२ वयोगटातील ७६ मुलांवर हा अभ्यास केला होता आणि त्यांना प्रश्न विचारले गेले होते. या मुलांना ३ तासांसाठी जेवण आणि २ तासांसाठी फोन  दिला नव्हता. त्यावेळी त्यांनी वर्तमान पत्राचे वाचन केले किंवा अभ्यास केला. पण त्यानंतर त्यांना संगणकावर एक काम दिले गेले. जिंकल्यावर त्यांना फोन वापरायला मिळणार होता किंवा आवडीचा पदार्थ. प्रश्नातून त्यांना विचारण्यात आले की तुम्ही त्या टास्कमध्ये कशावर किती पैसे खर्च कराल? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये या तरुणांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- Advertisement -

या सर्वातून हा निष्कर्ष पुढे आला की तरूण वयोगटातली मुलं फोन वापरण्यासाठी जास्त मेहनत आणि कष्ट करू शकतात. जेवणापेक्षा सर्वप्रथम ते फोनला प्राधान्य देतात. काही काळ जेवण नाही मिळालेलं त्यांना चालेल, परंतु फोनपासून दूर राहणे त्यांना जमत नाही. ही फोनसाठीची धडपड जेवण, ड्ग्स आणि दारूपेक्षाही जास्त आहे. कारण तरूणाई फोनला व्यसनाधीन झालेली दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -