घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटविलेक्शनच्या गरजा!

विलेक्शनच्या गरजा!

Subscribe

गावाकडल्या सदू आणि दादूची शाळा सुटली…त्यांना त्यांच्या मास्तरने नुकत्याच, माणसाच्या मुलभूत गरजा शिकवल्या होत्या.

सदू दादूला म्हणाला, च्यामारी दादू, मास्तरने आपल्याला सांगितलं की मान्साच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र आन् निवारा हायती…मग लोक त्येच्याबद्दल का न्हाई बोलत?…

- Advertisement -

दादूनं लागलीच स्पष्ट केलं…म्हटलं, सदू, लेका, लोक रोजघडीला अन्न, वस्त्र आन् निवार्‍याबद्दल बोलताती, पन हे पालिटिकल लोक या अन्न, वस्त्र आन् निवार्‍याबद्दल फक्त विलेक्शनच्या अदुगर बोलताती…

…फक्त विलेक्शनच्या अदुगरच ते बोलताती? मंग विलेक्शनमधी काय बोलताती?…सदूनं भलामोठा आ वासला…

- Advertisement -

…विलेक्शनमधी काय बोलताती म्हंजे? विलेक्शनमदी फकस्त विलेक्शनचंच बोलताती…दादूनं महत्वाची माहिंती पुरवली…

…आरं पन आसं विलेक्शनमधी फकस्त विलेक्शनचंच कसं काय बोलत आसतील? ज्या लोकांसाठी त्ये विलेक्शन लढत्याती त्येंचं काय तरी बोलत आसतील की नाय?…सदूनं तोंडाचा आ कायम ठेवला…

…आसा कसा येडाखुळा तू, आरं विलेक्शनच्या टायमाला विलेक्शनचं बोलायचं आसतं…दादूनं सदूची पार मस्करी करायलाच सुरूवात केली…

…तरीबी आज मास्तरनं आपल्याला शिकविलेल्या अन्न, वस्त्र, निवार्‍याबद्दल या विलेक्शनवाल्यांनी नगं का बोलाया? मास्तर तर म्हनले की या तीन गरजांवर मानसाचं आख्खं जगनं असतं?…सदूनं एकदम मुलभूत मुद्याला हात घातला…

…आरं या तीन गरजा तुज्या बाला आन् माज्या बाला. त्येच्याबद्दल येकतर हे पालिटिकसवालं विलेक्शनच्या आदुगर बोलताती, न्हाइतर मग येकदम विलेक्शन झाल्यावर…दादूनं पुन्हा एकवार सदूला माहिती पुरवली…

…आरं पन त्ये पालिटिकसवालं आमच्या जगन्याच्या या गरजांबद्दल विलेक्शनमधी का काय बोलत नाय? मग आपला मास्तर आम्हास्नी कशापाय मुलभूत गरजा शिकवून राह्यलाय?…सदूचं डोकं पार कामातून गेलं…

…आरं सदू, आपल्या जगन्यामधल्या गरजांवर बोलून विलेक्शनमधी त्यांना काय फायदा?…दादूने निर्णायक प्रश्न विचारला…

…म्हंजे?…सदूनंसुध्दा प्रश्न केला…

…जगन्याच्या गरजा अन्न, वस्त्र आन् निवारा आन् विलेक्शनच्या गरजा देशप्रेम, राष्ट्रवाद आन् धर्मवाद!…दादूनं उत्तर दिलं आणि खो खो हसत घराकडं पळाला…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -