मुंबई – मला हलक्यात घेऊ नका… 2022 ला टांगा पलटी केला… हा इशारा ज्यांना समजायचा त्यांना समजलाय! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा इशारा कोणासाठी आहे, आणि कोणाला समजला. असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत विचारला जात आहे. शरद पवारांनी तर मला ही फ्रेजच माहित नाही, असे म्हणत या चर्चेपासून स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न केला.
उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी मला हलक्यात घेऊन नका, असा इशारा कोणाचेही नाव न घेता दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी 200 आमदार निवडून आणण्याचा शब्द दिला होता. 237 आमदार निवडून आणले आहेत. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी 2022 ला शिवसेनेसोबत काय केले याचीही आठवण करुन दिली.
मला हलक्यात घेऊन नका, एकनाथ शिंदे यांच्या या वाक्याचा अर्थ काय, हा इशारा कोणाला आहे, असे शरद पवारांना आज पत्रकारांनी विचारले त्यावर शरद पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले की, मला थोडी बहूत मराठी समजते. मला हलक्यात घेऊन नका, ही फ्रेज मला काही माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर तुम्हीच माझ्या ज्ञानात भर घाला, असा असे उत्तर शरद पवारांनी दिले. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या मला हलक्यात घेऊ नका या वाक्याची चर्चा सुरु झाली
दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या मला हलक्यात घेऊ नका, या वाक्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे नेमके कोणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. ते मशालीने हलक्यात घ्यायचे नाही की… अजून कोणी घ्यायाचे नाही? यावेळी अजित पवारांनी घेतलेला पॉज आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे त्यांना कोणाचे नाव घ्याचे हे सांगून गेले.
अजित पवारांच्या या मिश्किल टिप्पणीनंतर एकनाथ शिंदेंचेही भाषण झाले आणि त्यांनी अजित पवारांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. मला हलक्यात घेऊन नका, हे अडीच वर्षापूर्वीचे होते, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. मात्र राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या कॉल्डवॉरच्या चर्चे दरम्यान शिंदेंच्या ‘हलक्यात घेऊ नका,’ वाक्याने त्यांचा हा इशारा नेमका कोणाला आहे, याबद्दल चर्चेला उधाणा आले आहे.
हेही वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदींचा लाडका मुख्यमंत्री कोण? भागलपूरच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी नावच सांगितले