Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईAir Iindia : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान अर्ध्यातून माघारी; काय आहे कारण

Air Iindia : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान अर्ध्यातून माघारी; काय आहे कारण

Subscribe

मुंबई – मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेत असतानाच अर्ध्यातून माघारी बोलवण्यात आले आहे. न्यूयॉर्कला जाणारे विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. यानंतर विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. 320 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आणि सुरक्षा एजन्सींकडून त्याची तपासणी करण्यात आली. आज (सोमवार) मुंबई-न्यूयॉर्क (जेएफके) विमान प्रवासादरम्यान एआय 119 विमानात सुरक्षेचा धोका आढळून आला. यानंतर विमानातील प्रवाशांची सुरक्षा विचारात घेत आवश्यक प्रोटोकॉल नुसार विमान परत मुंबईला वळवण्यात आले, अशी माहिती एअर इंडियाच्या निवेदनात देण्यात आली आहे.

विमानाची उड्डाणाची वेळ बदलण्यात आली

एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानाच्या शौचालयात विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र आढळून आले. विमानात 19 क्रू मेंबर्स आणि 322 प्रवासी होते. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान मुंबई येथे सकाळी 10.25 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सुरक्षेसाठी विमानाची तपासणी करण्यात आली. मुंबईत विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमान सुरक्षित स्थळी आणून विमानाची तपासणी करण्यात आली. विमानाच्या तपासणीनंतर विमानाची उड्डाणाची पुढील वेळ बदलण्यात आली. हे विमान आता दुसऱ्या दिवशी 11 मार्चला सकाळी 5 वाजता उड्डाण करणार आहे. तोपर्यंत प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांना अन्न आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.

बॉम्बच्या धमकीच्या पत्रामुळे सोमवारी मुंबई विमानतळावर तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवून विमानाच्या शौचालयात पत्र ठेवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा : Maharashtra Budget 2025: लाडकी बहिणी, शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अर्थसंकल्प; मराठवाडा वॉटर ग्रीडही कोरडे; दानवेंचा हल्लाबोल