Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईKurla Station : स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पास विलंब, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Kurla Station : स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पास विलंब, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Subscribe

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पाच्या अंतर्गत कुर्ला स्टेशन सुंदर बनविण्याचे काम ठरलेली मुदत उलटून आणखीन तीन महिने झाले तरीही अद्यापही अपूर्णच आहे. सदर कामाला खूपच विलंब होत आहे, अशा शब्दात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पाच्या अंतर्गत कुर्ला स्टेशन सुंदर बनविण्याचे काम ठरलेली मुदत उलटून आणखीन तीन महिने झाले तरीही अद्यापही अपूर्णच आहे. सदर कामाला खूपच विलंब होत आहे, अशा शब्दात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, हे काम पूर्ण व्हायला आणखीन किती काळ कुर्लावासियांना प्रतिक्षा करावी लागणार आहे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने, संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Anil Galgali demands blacklisting of contractors working for Kurla Station improvement project)

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पाच्या अंतर्गत कुर्ला स्टेशनच्या विकासाचे काम ठरलेल्या मुदतीनुसार 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत फक्त 40 टक्के काम पूर्ण झाले असून 60 टक्के काम अद्यापही अपूर्णच आहे. 2024 या वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुद्धा उलटला. त्यानंतर उजाडलेल्या 2025 या नवीन वर्षात जानेवारी, फेब्रुवारी असे दोन महिने उलटले. म्हणजेच नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत एकूण तीन महिने अगोदरच उशीर झाला असून आणखीन किती महिने कुर्ला येथील प्रवाशांना कुर्ला स्टेशन सुधारित, विकसित आणि सुंदर बनण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे, अशा संतप्त सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित करीत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : वर्षभरात 4200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 17 हजार आरोपींना अटक; मुख्यमंत्र्यांची माहिती

अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता, 7 डिसेंबर 2023 रोजी मेसर्स Technocrat Associates या कंपनीला कामाचा आदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते. सदर प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024 होती. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, सद्यस्थितीत केवळ 40 टक्केच पूर्ण झाले असून, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 10.94 कोटींचा खर्च केला जात आहे. असे असतानाही कामात दिरंगाई होत आहे, याबद्दल नाराजी व्यक्त करत अनिल गलगली यांनी म्हटले की, रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि कंत्राटदारांवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कुर्ला स्टेशन येथील प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत गती शक्ती युनिट तर्फे पायाभूत सुविधा सुधारणा आणि सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे सुधारणा व परिसर सौंदर्यीकरण करणे. प्रवेशद्वारांचा विकास व सुशोभीकरण करणे. उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मवर छप्पर बसविणे. स्थानकाची उंची व संरचनेत सुधारणा करणे. स्टेशन अंतर्गत सजावट, प्रतीक्षा कक्ष आणि अन्य सुविधांचे अद्ययावतिकरण करणे. शौचालयांचे आधुनिकीकरण व स्वच्छतेवर भर देणे. दर्जेदार आणि टिकाऊ फर्निचरची उपलब्धता करणे. 12 मीटर रुंद मध्यवर्ती पादचारी पुलाची (फूट ओव्हर ब्रिज) उभारणी, ज्यामध्ये रॅम्पची सुविधाही करणे ही कामे अंतर्भूत आहेत.

हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेची 16 हजार कोटींची देणी थकीत, उद्योजकांनी थकवला मालमत्ता कर