Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईBest Bus : महाशिवरात्रीनिमित्त बेस्ट उपक्रमाच्या जादा बसगाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

Best Bus : महाशिवरात्रीनिमित्त बेस्ट उपक्रमाच्या जादा बसगाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

Subscribe

26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरात लाखोंच्या संख्येने शिवभक्त दर्शनाला घराबाहेर पडतात. त्यामुळे अशा भक्तांना इच्छित कान्हेरी गुंफा, बाबुलनाथ मंदिर आदी ठिकाणी ये-जा करणे सुलभ व्हावे, या दृष्टीने बेस्ट उपक्रमाकडून जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई : 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध शिवमंदिरात लाखोंच्या संख्येने शिवभक्त दर्शनाला घराबाहेर पडतात. तसेच, पर्यटक सुद्धा जास्त प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे अशा भक्तांना इच्छित कान्हेरी गुंफा, बाबुलनाथ मंदिर आदी ठिकाणी ये-जा करणे सुलभ व्हावे, या दृष्टीने बेस्ट उपक्रमाकडून जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शिवभक्तांना प्रवास करणे सुलभ व सुखद होणार आहे. (BEST initiative to provide additional buses on the occasion of Mahashivratri)

“कान्हेरी गुंफा” येथील पुरातन लेण्यांना भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. 188 मर्या. या बसमार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी 10.30 वा. पासून ते संध्याकाळी 19.30 वा. पर्यंत एकूण 6 जादा बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा दरम्यान नियमित बससेवा देखील कार्यरत राहील. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार, एलोरा चौकी (बोरिवली स्थानक पूर्व) तसेच “कान्हेरी गुंफा” येथे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी

या व्यतिरिक्त बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सकाळी 7.00 वा. ते संध्याकाळी 19.00 वा. यादरम्यान बसमार्ग क्र. 57, 67 आणि 103 या बसमार्गावर एकूण 8 जादा बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी या अतिरिक्त बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा – Politics : रणरागिणी सारखं समोर या आणि उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, बच्चू कडूंची मागणी


Edited By Rohit Patil