HomeमहामुंबईBMC Budget 2025 : मुंबई मनपाचा 74427.41 कोटींचा आणि 60.65 कोटी रुपये...

BMC Budget 2025 : मुंबई मनपाचा 74427.41 कोटींचा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प

Subscribe

मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प 74427.41 कोटी रुपये आकारमान असलेला, मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. शिक्षण खात्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा 3955.64 कोटी रुपयांचा आहे. (BMC Budget 2025: 74427.41 crores budget of BMC)

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यंदा 14.19 टक्क्यांची वाढ दर्शविण्यात आली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 59,954.75 हजार कोटी रुपये आकारमान असलेला तसेच, 58.22 कोटी रुपये शिलकीचा होता. मुंबई महापालिका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने या अर्थसंकल्पात विविध तरुतुदी करण्यात आल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात जल आणि मल:निसारण विभागासाठी 2663.15 कोटी रुपये, रस्ते आणि वाहतूक खात्याकरिता 5100 कोटी रुपये, कोस्टल रोडसाठी 1507 कोटी रुपये, दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी 4300 कोटी रुपये, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958.73 कोटी रुपयांची तरतूद तर, पूल खात्याकरिता 8238.73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

हेही वाचा – Munde on radar : बीडच्या त्या कामांची होणार पक्षांतर्गत चौकशी, खुद्द अजित पवारांनी दिले आदेश

अशा आहेत इतर तरतुदी

  • पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 7700 कोटी रुपये
  • जल अभियंता खात्यासाठी 1082.74 कोटी रुपये
  • पर्यावरण करिता 113.18 कोटी रुपये
  • घनकचरा व्यवस्थापन खात्यासाठी 577 कोटी रुपये
  • पर्जन्य जलवाहिन्या खात्यासाठी 2200 कोटी रुपये
  • अग्निशमन दल खात्यासाठी 261.72 कोटी रुपये
  • आपत्ती व्यवस्थापन विभागाकरिता 309 कोटी रुपये
  • उद्यान खात्याकरीता 388.48 कोटी रुपये
  • देवनार कत्तल खान्यासाठी 13.02 कोटी रुपये
  • कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी रुपये

रस्त्यांचे काँक्रिटिकरण

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती या अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. उर्वरित काँक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील 75 टक्के तर दुसऱ्या टप्प्यातील 50 टक्के कामे जून 2025पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे पडण्याची समस्या कमी होईल, असा महानगरपालिकेचा दावा आहे.

झोपडपट्टीतील गाळेधारकांना कर

झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांकडून मुंबई मनपा कर आकारणी करणार आहे. झोपडपट्टीतील या गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल अपेक्षित आहे. मुंबई महापालिका हद्दीत सुमारे अडीच लाख झोपडपट्ट्या असून, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे, दुकाने, गोदामे हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर केला जात आहे. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मुंबई महापालिका मालमत्ता कर वसूल करणार आहे.

हेही वाचा – US Immigration Policy : ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यास जिथे मोदींनाच निमंत्रित केले नाही…, ठाकरेंचा निशाणा