मुंबई : मुंबई महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अंदाजित अर्थसंकल्प मंगळवारी (4 फेब्रुवारी) अमित सैनी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) हे शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प तर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर हे महापालिकेचा संपूर्ण अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केला. 2024चा अर्थसंकल्प 59,954.75 कोटी रुपयांचा आणि 58.22 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प होता. पण यंदाचा अर्थसंकल्प हा 74,427.41 कोटी रुपयांचा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प रुपये शिलकिचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 14 हजार 472 कोटी 66 लाख रुपयांनी वाढला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शिल्लक रकमेत 2 कोटी 43 लाख रुपयांनी वाढला आहे. (BMC Budget 2025 Mumbai commercial shops space to pay wealth tax)
हेही वाचा : BMC FD : पालिकेच्या राखीव निधीत घट कायम, मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 81 हजार कोटींवर
या अर्थसंकल्पामध्ये जल आणि मल करामध्ये तसेच, मालमत्ता करात कोणतीही वाढ केलेली नाही, असा दावा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केला. पण, मुंबई महापालिकेने 2 लाख 32 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची विकासकामे, विविध नवीन कामे, योजना, सेवासुविधा मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय, आस्थापना खर्च भागविण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेने झोपडपट्टीतील हॉटेल, दुकाने, गोदामे इत्यादी लघु उद्योगावर (20 टक्के म्हणजेच 50 हजार व्यवसायिक झोपड्यांच्या ठिकाणी) वक्रदृष्टी फिरवत मालमत्ता कर वसुली करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वेक्षण सुरू असून त्यामुळे पालिकेला 350 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी होणारा मोठा खर्च पाहता महापालिका कायदेशीर सल्ल्याने मुंबईकर ‘घन कचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क’ टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे. त्याचप्रमाणे विविध खात्यामार्फत आकारण्यात येणाऱ्या आकार आणि शुल्कात सुधारणा म्हणजेच वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे महागाईने पिचलेल्या मुंबईकरांना या कर आणि दर वाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांवर कर आणि दरवाढ लादल्यास त्यास राजकीय पक्षांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे.
16,699 कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढणार
मुंबई महापालिकेच्या विविध बँकात तब्बल 92 हजार कोटींच्या मुदत ठेवी जमा होत्या. मात्र गेल्या अडीच वर्षात महापालिकेने 2 लाख कोटींची कामे हाती घेतल्याने 92 हजार कोटींच्या मुदत ठेवीपैकी तब्बल 11 हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढला आहेत. आता बँकांत 81,774 हजार 42 कोटींच्या ठेवी जमा आहेत. या अर्थसंकल्पात त्यापैकी 16 हजार 699 कोटी रुपयांच्या ठेवी या मोडीत काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला विरोधकांच्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.