HomeमहामुंबईBMC FD : पालिकेच्या राखीव निधीत घट कायम, मुदत ठेवी 92 हजार...

BMC FD : पालिकेच्या राखीव निधीत घट कायम, मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 81 हजार कोटींवर

Subscribe

सन 2021-22च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात पालिकेच्या मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 86 हजार कोटींवर आल्या होत्या. तर, 2025-26च्या अर्थसंकल्पात ही रक्कम आता 81,774 कोटी रुपयांवर आली असल्याचे स्पष्ट झाले

मुंबई : राज्यामध्ये जून 2022मध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची सूत्रे महायुती सरकारच्या हाती गेली. तेव्हापासून आतापर्यंत राज्य सरकारने महापालिकेच्या राखीव निधीचा मुक्तहस्ते वापर केल्याचे समोर आले आहे. यावरून विरोधी पक्षांकडून विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. आज, मंगळवारी मांडलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा ही बाब अधोरेखित झाली आहे. (BMC FD : Big decrease in reserve fund of municipality)

राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका गेल्या सुमारे पाच-सहा वर्षांत झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकाच्या माध्यमातून या सर्व महापालिकांची सूत्रे राज्य सरकारच्या हाती आहेत. त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जवळपास 25 वर्षे मुंबई मनपाची सत्ता भोगणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्याचा आरोप भाजपासह महायुतीकडून केला जात आहे. महापालिकेवर आपलाच झेंडा फडकवण्याचा चंग भाजपाने बांधला आहे, तथापि, ठाकरे गटाने मुंबई मनपाच्या ठेवी 92 हजार कोटी रुपयांच्या घरात नेऊन ठेवल्या होत्या, हे उल्लेखनीय.

हेही वाचा – Delhi Election : आपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप

गेल्या नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध योजना जाहीर करण्याचा धडाकाच तत्कालीन महायुती सरकारने लावला होता. त्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही खूपच लोकप्रिय ठरली आणि याच योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेवर आली. असे एकीकडे घडत असताना दुसरीकडे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षित ठेवी पोखरल्या जात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपल्याने आयुक्तांच्या माध्यमातून पालिकेवर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. सत्तांतरानंतर महायुती सरकारने मुंबई महापालिकेच्या मुदती ठेवी वापरण्यास सुरुवात केली आहे. सन 2021-22च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात पालिकेच्या मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 86 हजार कोटींवर आल्या होत्या. तर, 2025-26च्या अर्थसंकल्पात ही रक्कम आता 81,774 कोटी रुपयांवर आली असल्याचे स्पष्ट झाले.

पालिका कर्मचार्‍यांच्या पीएफचा पैसा इतरांना

वास्तविक मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प, मुंबईकरांना परवडणारी घरे, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड अशा प्रकल्पांचा खर्च यासाठी या ठेवी केल्या जातात. तसेच पालिका आर्थिक संकटात असेल तर या मुदत ठेवींमधील 30 ते 40 टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युईटी यावर खर्च करण्याची तरतूद अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. यासाठी एवढी वर्षे या मुदत ठेवी राखून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईकरांसाठी आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी हा निधी वापरणे आवश्यक आहे. (BMC FD : Big decrease in reserve fund of municipality)

हेही वाचा – BMC Budget 2025 : मुंबई मनपाचा 74427.41 कोटींचा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प