Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईBombay HC : चार दिवस सोबत राहिले, मुलीला परिणामांची कल्पना, आरोपीला जामीन देताना काय म्हणाले न्यायालय

Bombay HC : चार दिवस सोबत राहिले, मुलीला परिणामांची कल्पना, आरोपीला जामीन देताना काय म्हणाले न्यायालय

Subscribe

पाच वर्षांहून अधिक काळ बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन दिला.

Bombay HC On Rape Accused : मुंबई : पाच वर्षांहून अधिक काळ बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एका आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन दिला. या आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत देखील गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील 14 वर्षांच्या या मुलीला आपण काय करत आहोत याची पूर्ण कल्पना होती. ती आपल्या मर्जीनेच त्या आरोपीसोबत चार दिवस राहिली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. (bombay high court bail to rape accused says girl 14 year old knew impact of her actions)

न्या. मिलिंद जाधव यांनी आपल्या निर्णयात सांगितले की, पॉस्को कायद्यानुसार, पीडिता ही अल्पवयीन आहे, यात काहीच शंका नाही. मात्र, या प्रकरणातील अन्य समोर आलेल्या गोष्टी हे सांगतात की, आपण काय वागत आहोत याची या मुलीला पूर्णपणे जाणीव होती. त्यानंतरही ती चार दिवस आरोपीसोबत बाहेर राहिली. 2019 मधील हे प्रकरण असून या प्रकरणी डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांनी नोव्हेंबर 2019 मध्ये तिच्या हरवण्याची तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा – Uddhav Thackeray : माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे, तुमचे काय? काय म्हणाले उद्धव ठाकरे

तपासादरम्यान पोलिसांना काही दिवसांनी ही मुलगी जुहू चौपाटीच्या जवळ आरोपी आणि त्याच्या मित्रांसोबत सापडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. एका इंग्रजी नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा उत्तर प्रदेशचा आहे. त्यावेळी त्याचे वय 19 वर्षे होते आणि तो अनाथ आहे. ही घटना घडण्यापूर्वी दोन वर्षांपासून तो या पीडितेचा मित्र होता. अटक केल्यानंतर त्याने अनेकदा जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दरवेळी मुलीचे वय सांगून कनिष्ठ न्यायालयांनी हे अर्ज फेटाळून लावले.

मुंबई उच्च न्यायालयाने या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान पोलीस रिपोर्ट तसेच मुलीच्या जबाबावर लक्ष दिले. यात त्यांना काही विसंगती देखील आढळली. मुलीचे म्हणणे होते की, ती आरोपीसोबत सहमतीने रिलेशनशिपमध्ये होती. या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार, मुलीच्या वडिलांना त्यांच्या या नात्याची कल्पना होती. मात्र, मुलीच्या वकिलांचे म्हणणे होते की, मुलगी अल्पवयीन असल्याने तिची मान्यता ही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. यावर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला. आरोपीचा यापूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, आणि तो आधीच पाच वर्षे तुरुंगात राहिला आहे. त्यामुळे त्यााला जामीन देता येऊ शकतो.

हेही वाचा – Shashi Tharoor : माझ्यासमोर अनेक पर्याय, कॉंग्रेससोबतच्या ताणलेल्या संबंधांनंतर काय म्हणाले शशी थरूर?