Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईCM Fadnavis : विरोधकांनी सकारात्मक चर्चेंची संधी सोडली, त्यांच्यात 'हम आपके है कोन' स्थिती; फडणवीसांचा टोला

CM Fadnavis : विरोधकांनी सकारात्मक चर्चेंची संधी सोडली, त्यांच्यात ‘हम आपके है कोन’ स्थिती; फडणवीसांचा टोला

Subscribe

मुंबई – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (3 फेब्रुवारी) सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापानाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाध शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील एकाही प्रकल्पाला स्थगिती दिली नसल्याचा खुलासा यावेळी केला. विरोधकांमध्ये हम आपके है कोन? अशी स्थिती असल्याचीही टीका त्यांनी केली.

विरोधकांमध्ये ‘हम आपके है कोन’ अशी स्थिती

विरोधकांनी सरकारला 9 पानांचे पत्र दिले आहे. त्यावर 9 नावे आहेत त्यापैकी 7 जणांच्याच त्यावर सह्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात ‘हम साथ साथ है’ असे चित्र नाही तर ‘हम आपके है कोन’ अशी विरोधकांची स्थिती आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. तसेच ते म्हणाले की, महायुती सरकारचे पहिले अधिवेशन आहे. विरोधकांना सत्ताधाऱ्यांसोबत संवादाची संधी होती. सकारात्मक चर्चा करण्यासाठी विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संधी होती. मात्र त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला आणि संवादाच थांबवला आहे.

विरोधकांनी नऊ पानी पत्र दिले आहे. विरोधकांचे हे सर्व आरोप वर्तमान पत्रातील बातम्यांवर आधारीत आहेत. विरोधकांनी त्या बातम्यांवरील सरकारचा खुलासा वाचला असता तर त्यांचे पत्र अर्ध्या पानात आले असते. असे टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील एकाही प्रकल्पाला स्थगिती दिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. माध्यमांनी कोणत्याही बातम्या देण्यापूर्वी दुसरी बाजू तपासली पाहिजे, असे माध्यमांचेही कान मुख्यमंत्र्यांनी टोचले. नंबर प्लेटच्या बातम्याही एकांगी असल्याचे सांगत इतर राज्यातील किंमती आणि महाराष्ट्रातील दर हे वेगळे नसल्याचा दावाही त्यांनी केला.

आम्ही तिघे शिवाजी महाराजांचे मावळे

नागपूरमधील कथित पत्रकार प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याविरोधात कोणी काही बोलले तर त्यांच्यावर कारवाई होणारच.
इशरत जहाँच्या नावाने रुग्णवाहिका सुरु करणाऱ्यांकडून आम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यायचे नाही. आम्ही तिघेही येथे शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करत आहोत.

धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आधीच भुमिका स्पष्ट केली आहे, असे म्हणत दोषी आढळल्यानंतरच त्यांचा राजीनामा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे – शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात आज एक दावा केला. 3 तारखेला धनंजय मुडेंचा राजीनामा होईल, असे करुणा मुंडे – शर्मा यांनी सोशल मीडियातून म्हटले. त्यामुळे, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मागील तीन कॅबिनेट बैठकींमध्ये गैरहजर राहिलेले मंत्री धनंजय मुंडे आज चहापान कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजित पवारांनी त्यांच्याकडे डुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे करुणा मुंडे यांच्या सोशल मीडियातील दाव्यात सत्यतात आहे का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करु; अजित दादांचे शिंदेंना मिश्किल उत्तर

अजित दादांचे शिंदेंना मिश्किल उत्तर

एकनाथ शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. महायुती सरकारचं हे दुसरं अधिवेशन आहे, तर या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. महायुती सरकारची ही नवी टर्म आहे मात्र टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्चीत बदल झाला आहे. पण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे. अशा हास्यविनोदाने एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. शिंदेंच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी तत्काळ उत्तर दिले., अजित पवार म्हणाले की, तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करु? असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातही दाबला. अजित पवारांच्या या हजरजबाबीपणामुळे हशा पिकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अजित पवारांच्या या फिरकीने खळखळून हसले.

हेही वाचा : Ajit Pawar : तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही…; अजितदादांचा एकनाथ शिंदेंना चिमटा