HomeमहामुंबईCrime : वाद झाला अन् तो हेल्मेट डोक्यावर मारत राहिल्याने एकाचा मृत्यू,...

Crime : वाद झाला अन् तो हेल्मेट डोक्यावर मारत राहिल्याने एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Subscribe

नवी मुंबई : नवी मुंबईतील रस्ते आणि वाद हे काय नवी मुंबईकरांना नवीन नाही. नवी मुंबईतील वाढत्या रहदारीमुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण याच वादामुळे रविवारी (2 फेब्रुवारी) एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, गाडीला कट मारल्याच्या रागातून एका दुचाकीस्वराने एका व्यक्तीला हेल्मेटने बेदम मारहाण केली. यावेळी तक्रार करण्यास गेलेल्या त्या व्यक्तीचा पोलिसांसमोरच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबद्दल पोलिसांनी एका तरुणाविरोधात आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Crime in New Mumbai Kharghar overtaking causes fight one died)

हेही वाचा : Kalyan Crime : जामीन झाला नाहीतर एके 47 घेऊन येतो, पीडित कुटुंबियांच्या घरासमोर तरुणाची धमकी  

मिळालेल्या माहितीनुसार, खारघर परिसरामधील बेलपाडा ते उत्सव चौक या रस्त्यावर रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री 8.30 च्या सुमारास दोन दुचाकीवरून जाणाऱ्यांचा भररस्त्यात वाद झाला. या किरकोळ वादाचे रुपांतर हे मारहाणीमध्ये झाले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर सातत्याने हेल्मेटने वार करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जखमी झालेले 45 वर्षीय शिवकुमार शर्मा हे पोलीस ठाण्यात गेले होते. खारघर पोलीसांना त्यांनी सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी त्यांची तक्रारसुद्धा लिहून घेतली. यावेळी शिवकुमार शर्मा यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पण अद्यापही पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले नसून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मृत्युपूर्वी शिवकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उत्सव चौकाजवळ त्यांची एका दुचाकीस्वारासोबत झटापटी झाली. गाडीला कट मारण्यावरून सुरू झालेल्या वादाचे हाणामारीमध्ये रुपांतर झाले. यावेळी समोरील समोरील व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर हेल्मेटने चारवेळा जोरदार वार केले. यानंतर ते स्वतः खारघर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार करण्यासाठी दुचाकी चालवून गेले. तिथे पोलिसांकडे एका 22 वर्षीय हिरव्या रंगाचा झब्बा घातलेल्या तसेच 25 वर्षीय काळ्या रंगाचा झब्बा घातलेल्या 2 जणांविरोधात तक्रार केली. यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याने आता पोलिसांनी त्या दोन मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांचे 15 वेगवेगळी पथके कार्यरत आहेत.