Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईMumbai Metro Update : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान, कोणती मेट्रो कधी धावणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी यादीच दिली

Mumbai Metro Update : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान, कोणती मेट्रो कधी धावणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी यादीच दिली

Subscribe

मुंबईत नेमके मेट्रो मार्गिकांचे किती, कोणते प्रकल्प चालू असून ते नेमके कधी मुंबईकरांच्या सेवेत येतील, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात दिली.

Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी मेट्रो सुरू करण्यात आली. यातील काही मेट्रोचे काम पूर्ण होऊन त्या मुंबईकरांच्या सेवेत रुजू देखील झाल्या आहेत. तर काही मार्गिकांचं काम सुरू आहे. काही मेट्रोंचे काम अद्याप प्राथमिक स्तरावरच असून ही कामे पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमके मेट्रो मार्गिकांचे किती, कोणते प्रकल्प चालू असून ते नेमके कधी मुंबईकरांच्या सेवेत येतील, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात दिली. (devendra fadnavis speech in vidhan sabha assembly session on mumbai metro projects)

5 वर्षांत 10 मेट्रो मार्गांना मान्यता

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या सविस्तर भाषणात मुंबईतील मेट्रो मार्गिकांच्या कामाची सद्यस्थिती काय आहे व या मार्गिका कधीपासून सुरू होतील, याची सविस्तर माहिती दिली. 2014 ते 2019 या काळात आपण जवळपास 10 मेट्रो लाईन्सला मान्यता दिली. त्यातल्या काही मेट्रो लाईन्स पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यात आहेत तर काही बांधकामाधीन आहेत, असं ते म्हणाले.

1. मेट्रो टप्पा 2 अ हा 19 जानेवारी 2023 मध्ये कार्यान्वित झाला. मेट्रो टप्पा 2 ब हा डिसेंबर 2025 पर्यंत कार्यान्वित होईल तर त्याचा दुसरा टप्पा ऑक्टोबर २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होईल.

2. मेट्रो ५ चं काम रखडल्याचा मुद्दा मांडला गेला. या मेट्रोच्या दोन टप्प्यात ठाणे ते भिवंडी आणि दुसरा भिवंडी ते कल्याण आहे. ठाणे ते भिवंडी या टप्प्याचं जवळपास 80 टक्के काम आपण पूर्ण केलं आहे. भिवंडी ते कल्याण या टप्प्यातल्या 5 किलोमीटरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन आहे. त्याचा विचार करून आता येथे भूमिगत मार्गिका टाकण्याचे ठरवले आहे. जेणेकरून पुनर्वसन करावं लागणार नाही आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल.

3. मेट्रो 3 चं 95 टक्के काम पूर्ण झालं आहे. आता त्याची चाचणीही झाली आहे. हा देशातला सर्वात मोठा भूमिगत टप्पा आहे. साधारणपणे जून 2025 पासून कफ परेडपासून सीप्झपर्यंत ही भूमिगत मेट्रो सुरू होईल.

हेही वाचा – IAF Fighter Jet Crash : हरियाणामध्ये हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात, समोर आली हे माहिती

4. वडाळा-ठाणे-कासारवडवली या मार्गिकेचं काम 79 टक्के पूर्ण झालं आहे. त्यात कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर 2025 मध्ये सुरू होईल. कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर 2026 पर्यंत तर गांधीनगर ते भक्ती पार्क नोव्हेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल.

5. कासारवडवली ते गायमुख या मार्गिकेचं 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत ही मार्गिका सुरू होईल. ठाणे-कल्याण-भिवंडीचं पहिल्या टप्प्याचं काम 95 टक्के पूर्ण झालं आहे.

6. मेट्रो 6 अंतर्गत स्वामी समर्थ नगर-विक्रोळी-कांजूरमार्गचं 78 टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबर 2026 मध्ये सुरू होईल.

7. 2023 मध्येच मेट्रो 7 सुरू केली आहे. मेट्रो 9 आणि मेट्रो 7 अ यातील दहिसर ते मीरा भाईंदर मार्गकेचं 95 टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर 2025 मध्ये ते काम पूर्ण होईल.

8. अंधेरी ते मुंबई विमानतळ मार्गिकेचं काम 55 टक्के झाले आहे. डिसेंबर 26 पर्यंत हे काम पूर्ण होईल. गायमुख ते शिवाजी चौक या मार्गिकेच्या अंतिम टप्प्यासाठीच्या कामाच्या परवानग्या अंतिम टप्प्यात आहेत.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारने एवढे कोटी दिले, आर्थिक पाहणी अहवालात केला उल्लेख