Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईFire In Mumbai : दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स येथील मरीन चेंबर्समध्ये भीषण आग

Fire In Mumbai : दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स येथील मरीन चेंबर्समध्ये भीषण आग

Subscribe

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग लागली आहे. मरीन लाइन्स येथील मरीन चेंबर्स येथे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबई : दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग लागली आहे. मरीन लाइन्स येथील मरीन चेंबर्स येथे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (Fire In Mumbai Massive fire breaks out in Marine Chamber at Marine Lines in South Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, मरीन लाईन्स येथील मरीन चेंबर इमारतीत शनिवारी (22 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागली. मरीन चेंबर्स ही पाच मजली इमारत असून, या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली आहे. ही इमारत दक्षिण मुंबईतील गोल मशिदीजवळ आहे. या आगीमुळे स्थानिक नागिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग भीषण असून, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे. दरम्यान, ही आग भीषण असली तरी, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतं. मात्र, इमारतीतल पाचव्या मजल्यावरील एका खोलीत आग लागल्याने वित्तहानी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

गोरेगावात महिन्याभरात दोनवेळा भीषण आग

गेल्या महिन्याभरात पुन्हा एकदा मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः उपनगरातील गोरेगाव येथे महिन्याभरात दोन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. अशातच आता गोरेगाव पूर्व येथे महिन्याभरात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गोरेगावमध्ये महिन्याभरात दोन वेळा पूर्वेला तर एकदा पश्चिमेला आगीच्या घटना घडल्या आहेत.

गुरुवारी (20 फेब्रुवारी) संध्याकाळी गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी परिसरात भीषण आग लागली. या आगीत 100 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर मोठ्या प्रमाणात शूटिंगचे सामान जळाले असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष नगर परिसराला लागून असलेल्या झोपडपट्टीत भागात ही आग लागली.


हेही वाचा – Suresh Dhas : पोलीस, डॉक्टर, देशमुखांचा मृतदेह अन्…; ग्रामस्थांच्या 8 मागण्या धसांनी एक-एक करून वाचल्या, काय मार्ग निघाला?