Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईGanesh Utsav 2025 : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यावर 2000 रुपयांचा दंड

Ganesh Utsav 2025 : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यावर 2000 रुपयांचा दंड

Subscribe

यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र यंदा गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्या नियमांचा सामना करावा लागणार आहे. कारण यंदा मंडपासाठी खोदण्यात येणाऱ्या प्रत्येक खड्ड्यावर माहापालिका दंड आकारणार आहे.

Ganesh Utsav 2025 मुंबई : यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मात्र यंदा गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्या नियमांचा सामना करावा लागणार आहे. कारण यंदा मंडपासाठी खोदण्यात येणाऱ्या प्रत्येक खड्ड्यावर माहापालिका दंड आकारणार आहे. महापालिकेने खड्ड्यांसाठी आकारलेला दंड हा 2000 रुपयांचा आहे. नुकताच पार पडलेल्या माघी गणेशोत्सवानंतर आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर देखील न्यायालयाच्या नियमांचं सावट असणार आहे. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा, अशा आशयाचे परिपत्रक महानगर पालिकेकडून जारी करण्यात आले आहे. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महानगर पालिकेने परिपत्रक जारी केले आहे. (Ganesh Utsav 2025 bmc important rules order charge 2000 rs fine for each pothole on road for mandap also ban on big and pop ganpati idols)

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात यंदाच्या गणेशोत्सवासाठी लागू केल्या जाणाऱ्या निर्बधांची माहिती देण्यात आली आहे. या परिपत्रकातील सर्वात पहिला निर्बध हा पीओपी गणेश मूर्तीबाबात आहे. त्यानंतर मुंबईतील अनेक भागांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाच्या आगमनासाठी रस्त्यांवर मंडप घातली जातात. मात्र, याच मंडपांवर यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान निर्बंध आणण्यात येणार आहेत. त्यानुसार, मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे खड्डे खणल्याचे आढळून आल्यास 2000 प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव 2025 पर्यावरणपूरक पद्धतीने आणि सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने मूर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून नियमावली आल्याने आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचं परिपत्रक

  • उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक 30-1-2025 रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. 12-5-2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
  • मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मुर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.
  • सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.
  • मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास 2000 प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
  • येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेशव्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा
  • उत्सवावादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहील एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी

पीओपीच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी

माघी गणेशोत्सवानंतर आता आगमी गणेशोत्सवाची तयारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरू केली आहे. मुंबईत मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाला यंदा नियमांची आडकाठी येण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपासून सुरु होणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवावर पालिकेकडून निर्बंध लादले जाण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने पीओपीच्या गणेशमूर्तींना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात गणेशोत्सव मंडळ नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – Pratap Sarnaik : एकनाथ शिंदेंकडे असताना नफ्यात, आता सरनाईक म्हणाले, ‘महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात’