मुंबई : एकीकडे बुधवारी (5 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये होत असलेल्या निवडणुकीची चर्चा होत असताना दुसरीकडे सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. अशामध्ये सामान्य नागरिकांनी सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. बुधवारी (5 फेब्रुवारी) मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 87 हजार पार गेला असून 87,550 रुपये इतका झाला आहे. तर 1 ग्रॅम सोन्याचा दर हा 8,755 रुपये झाला आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 79,390 रुपये होता. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. (Gold Price in Mumbai at 5 February 2025)
हेही वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभातील स्नानासाठी पंतप्रधान मोदींचा अनोखा लूक; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. 5 फेब्रुवारी रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,811 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,521 रुपये आहे. 4 फेब्रुवारी रोजी आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,704 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,404 रुपये होता. भारतात आज चांदीची किंमत 98.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 98,400 रुपये प्रति किलोग्राम आहे. तर 4 फेब्रुवारीला भारतात चांदीची किंमत 99.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,400 रुपये प्रति किलोग्राम होती. रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलरची घसरण, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाची शक्यता तसेच लग्नसराईच्या काळात देशाभारातून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता यासारखी प्रमुख कारणे सोन्याच्या दरवाढी मागे आहेत.
मुंबईमध्ये 1 जानेवारीला 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,150 रुपये होता. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,800 रुपये होता. तसेच, 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम मागे 71,500 रुपये झाला होता. गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात 16 हजारहून अधिकची वाढ झाली आहे. देशाची राजधानी नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 86,390 रुपये आहेत. चेन्नई, बंगळुरु, पुणे, हैदराबाद, कोलकाता येथे सोन्याचा दर 86240 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 86,290 रुपयांना 24 कॅरेट सोने मिळते. सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईत सोन्याचा भाव 87 हजारांच्या पार गेला असून गेल्या 24 तासात एक हजारांहून अधिकची वाढ झाली आहे.