मुंबई – महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यावरुन एकनाथ शिंदे यांनी टीका केली, विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला आहे. चहापान हा सरकार आणि विरोधक यांच्यातील संवादाचा कार्यक्रम असतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पत्रकार परिषदेत अजित पवार यांचे महत्त्वाचे मुद्दे
महायुतीचं सरकार चांगले चालावे यासाठी आमचे प्रयत्न
चार आठवड्यांचे अधिवेशन आम्ही ठेवले आहे
विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आम्ही तयारी ठेवली आहे
आमच्याकडे २३७ आमदार आहेत म्हणून कोणताही निर्णय रेटून नेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही
कामकाज रेटायचं असं आम्ही करणार नाही
एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे मुद्दे
नऊ पानांचं पत्र विरोधी पक्षाने दिले आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठे पत्र विरोधी पक्षाने दिले आहे.
143 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली
सूडभावनेने आम्ही कोणावरही कारवाई करणार नाही, तसा आमचा तिघांचाही स्वभाव नाही
आम्हाला जनतेला उतराई व्हायचे आहे, त्यासाठी आम्हाला काम करायचे आहे
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस
रणजी सामन्यात विदर्भाने केरळवर मात केली आहे. विदर्भाच्या संघाचे अभिनंदन
हम साथ साथ है असे चित्र नाही तर हम आपके है कोन अशी विरोधकांची स्थिती आहे
महायुती सरकारचे पहिले अधिवेशन आहे
सकारात्मक चर्चा करण्यासाठी विरोधकांना संधी होती
एक संवादाची संधी विरोधकांना होती मात्र त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला आणि संवादालाच थांबवले
विरोधकांनी नऊ पानी पत्र दिले आहे
विरोधकांचे हे सर्व आरोप वर्तमान पत्रातील बातम्यांवर आधारीत आहे
विरोधकांनी त्यावर सरकारचा खुलासाही वाचला असता तर त्यांचे पत्र अर्ध्या पानात आले असते
रोज मला एक स्थगितीची बातमी ऐकायला मिळते
माझ्या कार्यालयाला विचारले तर त्यांच्याकडून सांगण्यात येते की आपण कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही
एखाद्या आमदाराने पत्र दिले तर त्या संदर्भात माहिती घ्यावी अशी सूचना केली जाते
त्यावर लगेच चर्चा सुरु होते की स्थगिती दिली
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या एकाही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही
माध्यमांनी बातम्या देताना दोन्ही बाजू ऐकून बातमी दिली पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याविरोधात कोणी काही बोलले तर त्यांच्यावर कारवाई होणारच.
इशरत जहाँच्या नावाने रुग्णवाहिका सुरु करणाऱ्यांकडून आम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यायचे नाही.
आम्ही तिघेही येथे शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करत आहोत.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
विरोधकांनी लिहिले की १० लाख खाते बंद केले
सीएजी ने दिलेल्या नियमानुसारच लाडक्या बहिणींना मदत दिली जाणार नाही
लाडक्या बहिणींमध्ये कपात केली जाणार नाही
विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांच्या सूचनांचा आदर करु