HomeमहामुंबईMumbai BMC Budget : उत्पन्न वाढ करताना मुंबई पालिकेची प्रशासकीय खर्चात बचत

Mumbai BMC Budget : उत्पन्न वाढ करताना मुंबई पालिकेची प्रशासकीय खर्चात बचत

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेला मालमत्ता करापोटी यंदा 5,200 कोटी रुपये मिळणार आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी चालू आर्थिक वर्षात 70 कोटींचे उत्पन्न मिळाले असून पुढील आर्थिक वर्षात आणखीन 300 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसमोर एकीकडे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान उभे असताना दुसरीकडे पालिकेने खर्चात बचत करण्याचे धोरण अवलंबले असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. (Mumbai BMC Budget Bhushan Gagrani on revenue growth and saving expenses)

हेही वाचा : BMC Budget 2025 : मुंबईच्या झोपडपट्टीतील व्यावसायिकांना पालिकेचा दणका, वाचा सविस्तर 

मुंबई महापालिकेला राज्य शासनाकडून विविध अनुदान आणि इतर बाबींसाठी तब्बल 10 हजार कोटींची थकबाकी येणे बाकी आहे. ती वसूल करण्यात येणार आहे. तसेच, आणखीन उत्पन्न वाढविण्यासाठी मुंबई महापालिका वरळी, क्रॉफर्ड मार्केट येथील रिक्त भूखंड भाडे पट्टीने देणार असून त्याद्वारे पुढील 4 वर्षात मुंबई महापालिकेला अंदाजे 2 हजार कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. तसेच, मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये तब्बल 81,774 कोटी 42 लाख रुपयांच्या मुदत ठेवी जमा आहेत. त्याच्या व्याजात वाढ होण्यासाठी महापालिकेने ऑन लाईन गुंतवणूक धोरण अवलंबले अर्धा टक्का व्याज वाढवून म्हणजे 2,283.89 कोटी रुपये मिळणार आहे.

अग्निशमन दलाच्या मार्फत यंदा 759 कोटी रुपये तर जल आणि मलनि:सारण करापोटी 2,363 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. विकास नियोजन खात्यापोटी पालिकेला यंदा 9,700 कोटी रुपये तर जकाती पोटी पालिकेला राज्य शासनाकडून यंदा 14,398 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. अनुज्ञापन खात्याकडून यंदा 362 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. महापालिकेची चार जकात नाके बंद आहेत. त्या जागेचा व्यवसायिक वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने ऐरोली, मानखुर्द, मुलुंड, दहिसर येथील चार जकात नाक्यांच्या जमिनीपैकी दहिसर येथील जागेवर मुंबई बाहेरून येणाऱ्या 456 बस गाड्या आणि 1,424 मोटार गाड्या पार्किंग करण्याचे ठरवले आहे. तसेच, 131 खोल्यांचे तारांकित हॉटेल बांधण्यात येणार आहे. त्यातून पालिकेला चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे महापालिकेला जाहिरात आणि करमणूक शुल्क धोरणातून चांगले उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

पालिकेची स्थापना, प्रशासकीय खर्चात बचत

यंदाचा अर्थसंकल्प हा 74,427.41 कोटींचा आणि 50.65 कोटी रुपये शिलकीचा आहे. त्यामध्ये महसुली उत्पन्न 43,159 आणि महसुली खर्च 31204.53 कोटी दाखविण्यात आले आहे. तसेच, भांडवली उत्पन्न 909.85 कोटी तर खर्च 26,355.97 कोटी रुपये दाखवले आहे. मात्र पालिकेने महसुली खर्चाच्या हिश्यापोटी 75 टक्के वरून 42 टक्केपर्यंत सातत्याने घट झाली असून भांडवली खर्चाचा हिस्सा 25 टक्केवरून 58 टक्के पर्यंत पोहोचला आहे, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच आस्थापना खर्चात कपात करण्यात येणार आहे. तसेच, सौर ऊर्जेचा वापर करून विद्यमान वीज खर्चात 10 टक्के कपात करण्यात येणार आहे.


Edited by Abhijeet Jadhav