HomeमहामुंबईMumbai : काँक्रिट रस्त्यांसाठी 31 मे ची डेडलाईन, रस्त्यांच्या दर्जासाठी आयआयटीची नियुक्ती

Mumbai : काँक्रिट रस्त्यांसाठी 31 मे ची डेडलाईन, रस्त्यांच्या दर्जासाठी आयआयटीची नियुक्ती

Subscribe

मुंबई : मुंबईत खड्डे मुक्त रस्ते बनविण्यासाठी सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पण सदर रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजे 31 मे आधी पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कंत्राटदार, अधिकारी, एजन्सी यांना दिले आहेत. मुंबईत सध्या 1,333 सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा-1 अंतर्गत 698 रस्ते कामे हाती घेतली असून 75 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तर टप्पा-2 अंतर्गत 1,420 रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्याची 50 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. (Mumbai Deadline for concrete roads is May 31 says BMC Commissioner Bhushan Gagrani)

हेही वाचा : Aaditya Thackeray : मुंबईत अदानींना रोखणार कोण? मुंबई बजेटवर आदित्य ठाकरेंचा सवाल 

रस्त्यांची कामे चांगली दर्जेदार होण्यासाठी आयआयटी या संस्थेच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, ज्या रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करणे शक्य आहे. त्याच रस्त्यांची कामे सुरू करावीत, असे आदेश कंत्राटदार, अधिकारी आणि सल्लागार यांना देण्यात आल्याची माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. तसेच, ज्यांना आपल्या विभागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते नको असतील, तर त्यांनी तसे निवेदन महापालिकेला द्यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

खर्चात बचत करणार : आयुक्त गगराणी

मुंबई महापालिका यापुढे प्रशासकीय, प्रकल्प, योजना, आस्थापना खर्चात आर्थिक बचत करण्याचे धोरण स्वीकारणार असून या बाबतची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. तसेच, मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमात अवास्तव खर्च टाळण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात तरतूद रकमेपेक्षाही जास्त खर्च होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी प्रशासनाला केले आहे. पालिकेला महसुली खर्चात चांगली बचत करण्यात यश आले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

रस्ते कामांसाठी 16,434 कोटी

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा 16,434 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील रस्त्यांचे जाळे वाढविण्यात येणारा आहे. कोस्टल रोडचे काम 94 टक्के पूर्ण आले आहे. मे 2025पर्यंत या कोस्टल रोडचे संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे. सदर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 1507 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामासाठी 1958 कोटी रुपयांची आणि दहिसर ते भाईंदर उन्नत मार्गासाठी 4300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, 30 ठिकाणी पुलांच्या दुरुस्तीचे आणि नवीन पूल बांधणी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठीसुद्धा सदर निधीतून खर्च करण्यात येणार आहे.


Edited by Abhijeet Jadhav