Mumbai Road Accident News : मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा भरधाव वेगाने एका निरागस चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली. भरवेगात जाणार्या एका चारचाकीने फुटपाथवर झोपलेल्या मायलेकाला चिरडले. या गाडीच्या धडकेत वरदान निखिल लोंढे या दीड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची त्याची आई प्रिया लोंढे ही गंभीररीत्या जखमी झाली. या अपघाताने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईत काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना घडत असून याच संदर्भातली मुंबई वाहतूक पोलिसांची समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे. (mumbai hit and run incidents 38 percent reported 374 deaths in 351 road crashes in 2023 accidents data traffic police)
मुंबईतील रस्ते अपघातांबद्दल प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार, 2023 मध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये हिट अँड रनच्या घटना 38 टक्के होत्या. या अहवालानुसार अपघातातील 54 टक्के पीडित हे पादचारी होते. या अपघाताच्या आकड्यांचे अधिक विश्लेषण केले तर 2023 मध्ये रस्ते अपघातात 351 जणांचा मृत्यू झाला. 2015 नंतर या अपघातांमध्ये 39 टक्क्यांनी घट झाली आहे.
ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीच्या (BIGRS) सहकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी नुकताच हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, या अपघातांमध्ये दुचाकी आणि तीन चाकीवरील अपघातग्रस्तांचे प्रमाण हे 48 टक्के तर चालत जाणाऱ्यांचे प्रमाण 40 टक्के होते. या आकड्यांनुसार, अपघातातील 82 टक्के मृत्यूंसाठी पुरुष सर्वाधिक जबाबदार आहेत. 20 – 39 वयोगटातील 47 टक्के पुरुषांमुळे अपघात होतात.
हेही वाचा – IND Vs PAK : भारताने सामना जिंकताच आयआयटी बाबाही फिरले, म्हणे मला ठाम विश्वास –
या आकडेवारीचा हवाला देत एका अधिकाऱ्याने सांगितले की, या रस्ते अपघातात मृत्यू झालेले सर्वाधिक दुचाकी स्वार हे 20 – 29 या वयोगटातील होते. या अपघातांमध्ये हिट अँड रनचे प्रमाण 38 टक्के आहे. यातील जवळपास 54 टक्के पादचाऱ्यांना याचा फटका बसला. अनेक पादचाऱ्यांचा मृत्यू हा सायन – पनवेल महामार्ग, घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड आणि वरळी सीफेस जंक्शन अशा जोडरस्त्यांवर झाला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन – बांद्रा लिंक रोड आणि बैंगनवाडी सिग्नल जंक्शन, या जोडरस्त्यावर सर्वाधिक अपघाती मृत्यू तसेच जखमी झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवर प्रति किमी. सर्वाधिक मृत्यू झाले. आकड्यांच्या भाषेत 2023 मध्ये या रस्त्यांवर प्रति किमी. 10 मृत्यू झाले आहेत.
रस्ते अपघात रोखण्यासाठी देखील या अहवालात काही उपाय सुचवण्यात आले आहेत. यात गाड्यांचा वेग कमी ठेवणे, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट, गाड्यांसाठी सीट बेल्ट, पादचाऱ्यांसाठी सुरक्षा आणि सायकलस्वारांसाठी देखील काही गोष्टींची तरतूद करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – S. Jaishankar : प्रत्येक गोष्टीसाठी भारतावर आरोप करणे हा मूर्खपणा, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले