मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यात पर्यटकांची संख्या 64 हजाराने घटली आहे. त्यामुळे उत्पन्नात सुद्धा 27 लाखाने घट आली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ राणीचा बागच नव्हे तर, एकूणच मुंबई पर्यटनवाढीसाठी मुंबई महानगरपालिकेने नव्या योजना तयार केल्या आहेत. आज, मंगळवारी मांडलेल्या 2025-26च्या अर्थसंकल्पात या योजना प्रस्तावित केल्या आहेत.मुंबईत गेट व ऑफ इंडिया, जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू तारांगण आदी विविध पर्यटन स्थळे आहेत. मात्र मुंबईत राज्यासह देशातून विदेशातून येणारे पर्यटक भायखळा येथील राणीच्या बागेत हमखास भेट देतात. बच्चे कंपनी, तरुण, तरुणी अगदी प्रौढ नागरिक, ज्येष्ठ नागरिक हे पेंग्विन कक्षाला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाहीत. सध्या राणीच्या बागेत लहान-मोठे पक्षी, मगरी, माकड, बिबट्या, वाघ, गेंडा आदी विविध प्राणी आहेत. (Mumbai Tourism: Giraffe and white lion will be the attraction of Rani Baug)
गतवर्षी 2024मधील जानेवारी महिन्यात 2 लाख 91 हजार 136 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. त्यामुळे राणी बाग प्रशासनाला एक कोटी 14 लाख 66 हजार 987 रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा 2025च्या जानेवारी महिन्यात 2 लाख 26 हजार 519 पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बाग प्रशासनाला 87 लाख 24 हजार 445 रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राणीच्या बागेत 64 हजार 617 एवढ्या कमी पर्यटकांनी भेटी दिल्या. तसेच, गतवर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यात राणी बाग प्रशासनाला 27 लाख 42 हजार 542 रुपये कमी उत्पन्न मिळाले.
हेही वाचा – BMC Budget 2025 : मुंबई मनपाचा 74427.41 कोटींचा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प
आता या राणीच्या बागेत आधुनिकीकरणाची कामे सुरू आहेत. तसेच, पेंग्विन आणि वाघानंतर राणी बागेचे नवे आकर्षण म्हणून जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह आणि जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार आहेत, यंदाच्या अर्थसंकल्पात तशी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, संजय गांधी नॅशनल पार्कमधील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार असून काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार आहे. तसेच, लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. (Mumbai Tourism: Giraffe and white lion will be the attraction of Rani Baug)
हेही वाचा – BMC FD : पालिकेच्या राखीव निधीत घट कायम, मुदत ठेवी 92 हजार कोटींवरून 81 हजार कोटींवर