HomeमहामुंबईमुंबईFlower Festival in Rani Bagh : जॅकी श्रॉफ ,श्वेता बच्चन आणि अरुण...

Flower Festival in Rani Bagh : जॅकी श्रॉफ ,श्वेता बच्चन आणि अरुण कदम यांची उपस्थिती

Subscribe

मुंबई महापालिका (BMC) आयोजित 28 व्या वार्षिक 'मुंबई पुष्पोत्सव 2025' चे आयोजन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय) येथे करण्यात आले आहे. या तीन दिवसीय पुष्पोत्सवाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच आज अभिनेते जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन, अभिनेते अरुण कदम व त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नेहा जोशी यांनी भेट दिली.

मुंबई : मुंबई महापालिका (BMC) आयोजित 28 व्या वार्षिक ‘मुंबई पुष्पोत्सव 2025’ चे आयोजन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय) येथे करण्यात आले आहे. या तीन दिवसीय पुष्पोत्सवाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच आज अभिनेते जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन, अभिनेते अरुण कदम व त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नेहा जोशी यांनी भेट दिली. (Actors Jackie Shroff Shweta Bachchan Arun Kadam attend the flower festival at Rani Bagh)

महाराष्ट्र (शहरी भाग) झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975 च्या कलम 10 अंतर्गत मुंबईत हरित क्षेत्र वाढवणे आणि शाश्वत जीवनशैली प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जातो. या पुष्पोत्सवाची खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबईभर घेण्यात येणारी स्पर्धा, ज्यामध्ये झाडे लावणे, बागेची देखभाल करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे यासाठी नागरिक, कॉर्पोरेट्स आणि संस्था यांना प्रोत्साहन दिले जाते. सध्या या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध उद्यानतज्ज्ञ व विषयातील तज्ज्ञ यांच्याकडून सुरू आहे.

हेही वाचा – Ministry : मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता आणि पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

अभिनेते जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन, अभिनेते अरुण कदम व त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नेहा जोशी यांनी आज ‘मुंबई पुष्पोत्सव 2025’ ला भेट दिली. त्यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी उपस्थित अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेते अरुण कदम, अभिनेत्री नेहा जोशी आणि श्वेता बच्चन यांचे स्वागत केले.

भारताची राष्ट्रीय प्रतिके फुलांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे ही यंदाच्या ‘मुंबई पुष्पोत्सव’ वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शना मागची संकल्पना होती. यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी-सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला आणि मसाल्यांची रोपे मांडण्यात आली होती. महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते या मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, तरुण, तरुणी, अगदी ज्येष्ठ नागरिक आणि फिल्मी दुनियेतील अभिनेते, अभिनेत्री आदींनी भेट देत पाहणी केली. तसेच, महापालिका उद्यान खात्याचे कौतुक केले.

हेही वाचा – BDD Chawl Redevelopment Project : पात्र रहिवाशांना मार्चमध्ये घरं मिळणार! एवढ्या लोकांचा नंबर लागणार