HomeमहामुंबईमुंबईAaditya Thackeray : वरळीकरांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे पालिकेच्या दारी

Aaditya Thackeray : वरळीकरांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे पालिकेच्या दारी

Subscribe

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. वरळी येथील शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतारसंघांतील मतदारांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेच्या जी/ दक्षिण विभाग कार्यालयात साहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. वरळी येथील शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतारसंघांतील मतदारांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेच्या जी/ दक्षिण विभाग कार्यालयात साहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी, स्मशानभूमी, आपला दवाखाना, वेल्फेअर सेंटर, लोअर परळ पुलावर बनवण्यात येणाऱ्या पदपथाचे काम आदी समस्या तातडीने मार्गी लावण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली. यावेळी, संबंधित अधिकाऱ्यांनी सदर समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. (Aditya Thackeray at the door of the municipality to solve the civic problems of Worlikars)

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने (उबाठा) म्हणजे महाविकास आघाडीने अधिक जागा जिंकून भाजपा महायुतीला आसमन दाखवले. तर विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीनेही शिवसेनेसह महाविकास आघाडीला बहुमताने पिछाडीवर टाकत सत्ता मिळविली. मात्र आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीची पूर्व तयारी करण्याबाबत अगोदरच आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्यांदा वरळी विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्यावर आता या मतदरसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंवर खालचे कार्यकर्ते खापर फोडतायत, अजित पवारांची कोणावर टीका?

आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी महापालिकेच्या जी/दक्षिण विभाग कार्यालयात साहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत वरळी मतदरसंघांतील नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार, वेल्फेअर सेंटर आणि आपला दवाखाना हे लवकरच सुरू करण्याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांना आश्वासन दिले. तसेच, वरळी हिंदू स्मशानभूमीतील नूतनीकरण कामात थोडेफार बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, वादग्रस्त लोअर परळ पुलावर लवकरच नवीन फुटपाथ येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पालिकेकडून जी/दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त मृदूला अंडे यांच्याकडून देण्यात आले.

वरळीतील शाखा क्रमां 193 मधील वेलफेअर सेंटर आणि आपला दवाखाना तोडल्यानंतर त्या जागेवर पुन्हा इमारत बांधली गेलेली नाही. हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू करून रहिवाशांची गैरसोय दूर करू, असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांकडून यावेळी देण्यात आले. दरम्यान, या बैठकीला उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, संजय कदम आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Suresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश धस यांचे आवाहन