Homeताज्या घडामोडीAir India चं काय करायचं, मुंबई ते दुबई विमानाला लेटमार्क; नाराज प्रवाशांनी...

Air India चं काय करायचं, मुंबई ते दुबई विमानाला लेटमार्क; नाराज प्रवाशांनी विमानातच घातला गोंधळ

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रवाशांना विमान प्रवासावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी अपघात अशा घटनांमुळे विमान प्रवास असुरक्षित झाला आहे. अशात विमानाच्या उड्डाणाला लेट मार्क लागत असल्याने निश्चित स्थळी पोहोचण्यात उशीर होत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रवाशांना विमान प्रवासावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी अपघात अशा घटनांमुळे विमान प्रवास असुरक्षित झाला आहे. अशात विमानाच्या उड्डाणाला लेट मार्क लागत असल्याने निश्चित स्थळी पोहोचण्यात उशीर होत आहे. नुकताच मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (A1909) विमानाचं उड्डाण पाच तासांच्या विलंबनाने झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रवासी नाराज असल्याचे दिसत आहेत. (air india passengers mumbai to dubai flight let video viral)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (A1909) विमानाचं उड्डाण सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी होणार होते. पण उड्डाणासाठी तांत्रिक बिघाडामुळे त्याला 4 तास 45 मिनिटे उशीर झाला. यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये विमानातील प्रवासी केबिन क्रूशी वाद घालताना दिसत आहेत. तसेच, इतका उशीर झाल्याने विमानातील प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना दुपारी एकच्या सुमारास विमानातून खाली उतरवण्यात आले.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांनी विमानात नाराजी व्यक्त करत क्रूशी वाद घातला. या सगळ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये प्रवासी केबिन क्रू क्रमचाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. काहीजण आदळाआपट करताना देखील पाहायला मिळत आहेत. विमानातील प्रवासी त्यांना विमानाबाहेर जाऊ दिले जावे अशी मागणी करत होते. हा व्हयरल व्हिडीओ या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasvi Anandkumar Soni (@udtapatang)

शिवाय, या व्हायरल व्हिडीओतून प्रवासी तेजस्वी अनंदकुमार सोनी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानुसार, “एअर इंडियाच्या AI909 विमानातील प्रवाशांना भीषण अनुभव आला. विमान सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण करणे अपेक्षित होते. पण विमानात एसी सुरू नसल्याच्या स्थितीत प्रवाशांना पाच तास उशिराचा सामना करावा लागला. प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि तरीही प्रवाशांनी त्यांना गेट उघडण्यास आणि खाली उतरू देण्यास भाग पाडेपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणताही मदत केली नाही”, असे प्रवाशाने म्हटले आहे.


हेही वाचा – ST fare hike : परिवहन मंत्र्यांची केवळ चमकोगिरीच; एसटी भाडेवाढ रद्द करा – अंबादास दानवे