Homeमहामुंबईमुंबईअजित पवारांनी राजीनामा नाही घेतला तरी धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार; अंजली दमानियांनी...

अजित पवारांनी राजीनामा नाही घेतला तरी धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार; अंजली दमानियांनी चालली ही चाल

Subscribe

Anjali Damaniya  मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराडचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. एवढेच नाही तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध देखील आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्येचा तपास निष्पक्ष होण्यासाठी मंत्री धनंजय देशमुख यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम घ्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन केली. अजित पवारांनी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे दमानियांना सांगितले. अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर अंजली दमानिया पुढे काय करणार, याचाही त्यांचा प्लॅन तयार आहे. धनंजय मुंडेंची आमदारकी जाणारच असा ठाम विश्वास अंजली दमानियांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. किमान सहा महिने त्याला जामीन होणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे पुढील काळात आरोग्याच्या ग्राऊंडवर त्याला जामीन मिळू शकतो अशीही शंका अंजली दमानियांनी व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडे पती-पत्नीचे वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध

अंजली दमानिया यांनी आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधाचे पुरावेच सादर केले. धनंजय मुंडे त्यांची पत्नी राजश्री, आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहाराचे अनेक कागदपत्र अजित पवारांकडे सादर केली. त्यांनी ती काळजीपूर्वक पाहिली आणि उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत एकत्रित बसून योग्य निर्णय घेताल जाईल असं आश्वासन त्यांनी दिल्याचं दमानियांनी सांगितले. मात्र उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला नाही, तरीही लढा चालूच राहणार आहे. मुंडेंची आमदारकी जाणारच असा दावा दमानियांनी केला आहे.

धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात!

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित व्यवसाय कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांतून आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कशा पद्धतीने ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये बसतंय याची माहिती जमा केली आहे. या तिघांचे आर्थिक संबंध आहेत, यामुळे लोकप्रतिनिधी कायदा भंग होत आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटचे हे प्रकरण आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. भारतीय राज्यघटना कलम 102 (1) (A) आणि 191 (1) याचा दाखला त्यांनी दिला. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाचाही संदर्भ दिला. त्याचा आधार घेत लाभाचे पद या नियमावलीनुसार धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होऊ शकते, असा दावा दमानिया यांनी केला.

अंजली दमानिया यांचा आरोप आहे की, धनंजय मुंडे हे लोकप्रतिनिधी असताना ते, त्यांची पत्नी राजश्री आणि वाल्मिक कराड यांनी सरकारी मालकीची कंपनी महाजेनकोकडून आर्थिक लाभ घेतले आहेत. त्याचे सर्व पुरावे त्यांनी गोळा केले. मुंडे पती-पत्नी आणि कराडच्या बॅलेन्सशीटवर सह्या आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे फक्त फोटोच सोबत नाही तर त्यांचे आर्थिक व्यवहार देखील आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली जाणार आहे. दमानिया म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने मनात आणले तर धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईल. ही गोष्ट तत्काळ होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.

सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

अंजली दमानिया यांनी अजित पवारांना विनंती केली आहे की त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून धनंजय मुंडेंवर कारवाई करत राजीनामा घ्यावा, अन्यथा त्या निवडणूक आयोगाचे दार ठोठावणार आहेत. निवडणूक आयोगाने मुंडेंची आमदारकी रद्द केली नाही तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचा पर्याय देखील त्यांच्याकडे आहे. अंजली दमानिया यांनी आधीच सरन्यायाधीशांना कराड-मुंडे प्रकरणासंबंधी पत्र लिहिले आहे. हे पत्रच जनहित याचिका म्हणून दाखल करुन घ्यावे, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आधारावर मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट?

ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे, स्वतः आमदार किंवा खासदार असताना लोकप्रतिनिधी कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठलाही आर्थिक लाभ मिळून घेऊ शकत नाही, याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात. पण व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची कंपनी आहे. या कंपनीत धनंजय मुंडे देखील आहेत, वाल्मीक कराडही आहे आणि राजश्री मुंडे या देखील संचालक आहेत.

राजश्री मुंडे आजपर्यंत त्याच्या संचालक देखील आहेत. एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या आई हे सगळे टॉप  शेअर होल्डर आज देखील आहेत. असं असताना व्यंकटेश्वरा आणि टर्टर लॉजिस्टिक नावाची अजून एक कंपनी आहे, या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको कडून मिळतो असा दावा दमानियांनी केला आहे. तसे बॅलन्सशीट असल्याचा त्यांचा दावा आहे. फ्लाय अॅश सेल दाखवला गेला, त्या बॅलन्सशीटवर धनंजय मुंडे यांची सही आहे.

सुप्रीम कोर्टचे ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणात निर्णय आहे की एक रुपया जरी मिळाला तरी, त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं. या मुद्यारून मुंडे यांचं मंत्रीपदच नाही तर आमदारकीसुद्धा रद्द होईल, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

हेही वाचा :  Anjali Damania : दमानियांनी दिले पुरावे, अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; उद्याच मुंडेंचा राजीनामा?