मुंबई – परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दिवशी झालेला गोंधळ आणि मारहाण प्रकरणी 82 दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलाश फड आणि त्याच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप ठेवून हा गुन्हा दाखल करण्यात आला. परळीतील या घटनेत गुन्हा दाखल करण्यासाठी जवळपास तीन महिने लागले असल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावरुन रोष व्यक्त केला आहे. त्यासोबतच या घटनेसंदर्भातील माहिती दिली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
अंजली दमानियांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाकडे असे 20 – 25 तक्रारींचे व्हिडिओ आहेत. यातील प्रत्येक व्हिडिओनर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल, असे अंजली दमानियांनी म्हटले आहे. त्यासोबतच तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे आभार मानले आहेत.
अखेर ८२ दिवसानंतर गुन्हा दाखल !
कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल
विधान सभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे.
इलेक्शन कमिशन कडे असे २० ते २५ तक्रारीचे वीडियो आहेत. त्यातील प्रत्येक वीडियो वर कारवाई करा.
परळीतील निवडणूक… https://t.co/X0shMhap70
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे धनंजय देशमुख यांच्याविरोधात लढत होते. निवडणुकीदरम्यान ते बीड येथील बँक कॉलनी परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहण झाली होती. या प्रकरणी तेव्हाच मारहाण झालेले वकील माधव जाधव यांनी तक्रार दिली होती. मात्र तीन महिने या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षकांचे आभार मानले आहे. तसेच त्यांनी परळीची निवडणूक रद्द करुन तिथे पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सगळे पोलीस ठाणेच धनंजय मुंडेंच्या घरी घेऊन जा…
पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यास तीन महिने लागल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सगळे पोलीस हे धनंजय मुंडेंच्या घरातून केव्हा निरोप येतो याची वाट पाहतात. मग पोलिसांना सरकार कशासाठी पगार देते? हे सगळे पोलीस आणि पोलीस ठाणे धनंजय मुंडेंच्या घरीच घेऊन जा, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. तर अॅड. माधव जाधव यांनी देर आए दुरुस्त आए, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवीन पोलीस अधिकारी आल्यामुळे गुन्हा दाखल झाला असेही जाधव म्हणाले.
हेही वाचा : Election 2024 : धनंजय मुंडेंना धक्का; शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण, तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल