Homeक्राइमBaba Siddique Murder : सिद्दिकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड आला समोर...या सोशल मीडिया ऍपचा...

Baba Siddique Murder : सिद्दिकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड आला समोर…या सोशल मीडिया ऍपचा घेतला आधार

Subscribe

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेता बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अखेर समोर आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेता बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अखेर समोर आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. (baba siddique murder case mumbai police claims lawrence bishnoi brother anmol bishnoi is mastermind)

बाबा सिद्दिकी हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार गुजरातच्या साबरमती जेलमध्ये असलेला कुख्यात लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई आहे. सिग्नल ऍपचा वापर करत तो अन्य आरोपींसोबत बोलत असे. याप्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. तर अनमोल, शुभम आणि झीशान फरार आहेत.

हेही वाचा – Thackeray about Omar Abdullah : ज्युनियर अब्दुल्लांचे सूर बदलले, ठाकरे गटाचा घणाघात

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींसोबत अनमोलने सिग्नल ऍपच्या मदतीने फोन आणि मेसेज करून बोलत असे. आणि त्यांचे ब्रेनवॉश केले होते.

धर्म आणि समाजाच्या भल्यासाठी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्याची गरज असल्याचे अनमोलने त्यांना सांगितले होते. सलमान खान, दाऊद इब्राहिम यांच्यासोबत बाबा सिद्दिकी यांचा संबंध आहे. या दोघांनी मिळून अनुज थापन याची हत्या केली आहे.

आरोपपत्रानुसार, हे सगळे अनमोलशी बोलताना त्याचा ‘भाई’ असा उल्लेख करत होते. तसेच बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींना मोठ्या रकमा देण्याचा दावा देखील अनमोल बिश्नोईने केला होता.

दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी शुभम लोणकर हा भारतातच कुठेतरी लपल्याचा दावा गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. गुन्हे शाखा सध्या शुभम लोणकरच्या शोधात आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : राजा होणं म्हणजे…चाणक्यांची आठवण काढत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

अनमोल बिश्नोई याच्या म्हणण्यानुसार, पंजाब येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी आकाशदीप गिलने सिद्दिकी यांच्या हत्येसाठी पैशांची तयारी केली होती. अनमोल बिश्नोईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गिलने पैशांची व्यवस्था केली आणि नंतर 3 लाख रुपये शुभमला पाठवून दिले. याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी सलमान वोहराच्या नावाने कर्नाटक बॅंकेत उघडण्यात आलेल्या खात्याद्वारे हे पैसे शुभम लोणकरला पाठवण्यात आले.

अनमोल बिश्नोईच्या नंतर हे पैसे शुभम लोणकरने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील सहभागी अन्य आरोपींना पाठवले होते. या हत्याकांडासाठी उत्तर प्रदेशातून झालेल्या फंडिंगचे धागेदोरे शोधण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.