HomeमहामुंबईWalmik Karad : वाल्मिक कराडला दिलासा देणारी बातमी; मुंबई उच्च न्यायालयाने ही...

Walmik Karad : वाल्मिक कराडला दिलासा देणारी बातमी; मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली

Subscribe

मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास एसआयटी, सीआयडी करत आहे. गेल्या दीड महिन्यापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचे धागेदोरे आरोपींच्या संपत्तीपर्यंत पोहचले आहेत. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याने बीड आणि लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीनी, प्लॉट, घरे खरेदी केल्याचा आरोप होत आहे. तर बीड ते पुणे पर्यंत फ्लॅट आणि व्यावसायिक गाळे, आलिशान बिल्डिंगमध्ये ऑफिस स्पेस खरेदी केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने ईडी चौकशीची याचिका फेटाळली आहे.

वाल्मिक कराडच्या मालमत्तेची ईडी चौकशीची याचिका फेटाळली 

पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराड याच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यासोबतच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास उच्च न्यायालयाच्या निगरणीत व्हावी, अशी मागणी केली होती. याचिकेत म्हटले होते की, संतोष देशमुख हत्याकांडात एका कॅबिनेट मंत्र्याचे नाव वांरवार येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणातील आरोपी आणि मंत्र्यांचे अनेक कंपन्यांमध्ये भागिदारी आणि मालमत्तांचा संबंध समोर येत आहे, असे याचिकेत म्हटले होते.
केतन तिरोडकरांनी दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने तिरोडकरांची याचिका फेटाळली आहे. त्यासोबतचत त्यांना दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा : Sarangi Mahajan: धनंजय मुंडेचे वासे फिरले, जनतेचा रोष पाहून त्यानेच राजीनामा द्यावा; मामी पुन्हा भडकल्या

उच्च न्यायालयाने केतन तिरोडकरांची याचिका रद्दबातल ठरवली आहे. कोर्टाने ही स्वैर याचिका दाखल केल्याचे ताशेरे ओढले आहे. त्यासाठी याचिकाकर्ते तिरोडकरांना 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याचे मान्य केले. याचिकाकर्त्याचा हेतू स्पष्ट होत नसल्याचे मुख्य न्यायाधिशांनी म्हटले आहे. त्यांनी याचिकेवर सुनावणीस नकार दिला.

वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाईंड म्हटला जणारा वाल्मिक कराड हत्येनंतर 22 दिवस फरार होता. या दरम्यान तो मध्यप्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठीही गेला होता. यावेळी त्याच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही त्याच्यासोबत असल्याचा आरोप झाला होता. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शरण आला. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्याच्यावरील गुन्ह्यात वाढ करण्यात आली, हत्येसह मकोका कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (4 फेब्रुवारी) त्याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवाण्यात आली. यावेळी त्याला कोर्टात हजर करण्यात आले नव्हते.

हेही वाचा : CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडे राहणार गैरहजर