मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सातत्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. धक्काबुक्की, प्रवाशांची गर्दी, अपघात यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे प्रवाशांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असलेली मध्य रेल्वे सर्व विभागीय रेल्वेमध्ये आघाडीवर आहे. कारण मध्य रेल्वेच्या प्रवाशी संख्या 1583 दशलक्षने वाढली आहे. (Central Railway Big increase in passenger numbers of Central Railway top in all Divisional Railways)
भारतीय रेल्वेच्या सर्व विभागीय रेल्वेपैकी मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या 1465 दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात 1583 दशलक्ष प्रवासी उल्लेखनीय आहेत. अशाप्रकारे तब्बल ८ टक्क्यांनी प्रवाशांची संख्या वाढली आहे.
याशिवाय, एकिकडे प्रवासी संख्येत वाढ झाली असताना दुसरीकडे महसूलातही वाढ झाली आहे. गतवर्षी मध्य रेल्वेचे उत्पन्न 6414 इतके होते. त्यातुलनेत यंदा 7311 कोटी इतके उत्पन्न वाढले आहे. त्यानुसार 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विस्टाडोम कोचच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या महसूलात वाढ
मध्य रेल्वेवरील विस्टाडोम कोचना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते लोकप्रिय होत आहेत. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची नयनरम्य दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत. यामुळे गेल्या 10 महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत मध्य रेल्वेच्या गाड्यांवर धावणाऱ्या विस्टाडोम कोचमधून 1 लाख 47 हजार 429 प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांना विस्टाडोम कोचची भुरळ पडल्याने मध्य रेल्वेने यामधून 21 कोटी 95 लाख रुपयांचा महसूल कमावला आहे.
हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अश्विन रचणार इतिहास; वाचा सविस्तर