HomeमहामुंबईमुंबईChembur Metro Accident : चेंबूरमध्ये मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले, मोठी जीवितहानी टळली

Chembur Metro Accident : चेंबूरमध्ये मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले, मोठी जीवितहानी टळली

Subscribe

चेंबूरमधील एका वसाहतीसमोरून जाणाऱ्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी मोठी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले आहे.

मुंबई : चेंबूरमधील एका वसाहतीसमोरून जाणाऱ्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी मोठी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले आहे. आज शुक्रवारी (ता. 31 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुमन नगर सहकारी गृहनिर्माण परिसराच्या आवारात मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले. पहाटेची वेळ असल्याने या ठिकाणी वर्दळ नसल्याकारणाने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतु, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेट्रो मार्गिकेसाठी 20 फूट उंचीच्या सळ्या टाकून हे काम करण्यात येत आहे. पण आता ही घटना घडल्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. (Chembur Metro Accident Construction of Metro pillar falls on Society)

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सुमन सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. वडाळ्यापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. सध्या येथे मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असून सळई व काँक्रीटच्या साहाय्याने हे खांब उभारले जात आहे. यातीलच एक अर्धवट उभारलेला खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर व मोकळ्या जागेत कोसळला आहे. साधारणतः 20 फूट उंच असलेल्या या सळ्या कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे मेट्रोच्या कामावर, बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

हेही वाचा… शहरात उपद्रवाचे कारण डास, नायनाटासाठी पालिकेचे औषध खास

महत्त्वाची बाब म्हणजे, हे बांधकाम अजून थोडे बाजूला पडले असते किंवा रस्त्याच्या उजव्या बाजूला पडले असते तर फार मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे मेट्रोचे काम ज्या भागातून जाते, तिथे रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शीव-ट्रॉम्बे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परंतु, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, ही घटना जर का दिवसा घडली असती तर यामुळे किती मोठी दुर्घटना घडली असती, याचा विचार न करणेच चांगले अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.