Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईमुंबईChitra Wagh : महाराष्ट्रात राहता तर मराठी आलेच पाहिजे, चित्रा वाघ यांचा एअरटेलला इशारा

Chitra Wagh : महाराष्ट्रात राहता तर मराठी आलेच पाहिजे, चित्रा वाघ यांचा एअरटेलला इशारा

Subscribe

नुकताच मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या चारकोप विभागातील एअरटेल गॅलरीत मराठी भाषा न बोलण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एअरटेल गॅलरीत काम करणाऱ्या एका तरुणीने 'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', असे म्हणत तरुणासोबत वाद घातला.

मुंबई : नुकताच मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या चारकोप विभागातील एअरटेल गॅलरीत मराठी भाषा न बोलण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एअरटेल गॅलरीत काम करणाऱ्या एका तरुणीने ‘क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है’, असे म्हणत तरुणासोबत वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या गॅलरीत मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन माफीनामा घेतला आहे. तर, आता याच मुद्द्यावरून भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी एअरटेल गॅलरीच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. (Chitra Wagh warns Airtel gallery staff after being rejected for speaking Marathi)

गेल्या काही दिवसांपासून मराठी वि. अमराठी असा वाद सातत्याने चिघळताना पाहायला मिळत आहे. अशातच चारकोपच्या एअरटेल गॅलरीत झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा या वादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे या वादात उडी घेत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट करत एअरटेल कंपनीला आणि येथील कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एअरटेल गॅलरीमधील उद्दाम आणि उद्धपटपणा समोर आला आहे. महाराष्ट्रात राहता तर मराठी आलंच पाहिजे आणि येत नसेल तर ती शिकण्याची तयारी आणि भाषेचा आदर करायला शिका. मी एअरटेलला सांगू इच्छिते, या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या उद्दाम मुलीवर ताबडतोब कारवाई करा.”

हेही वाचा… MPSC : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन, फडणवीसांची माहिती

तसेच, “यापुढे एअरटेलच्या प्रत्येक गॅलरीमध्ये मॅनेजर असो किंवा कोणताही कर्मचारी त्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, अशा जास्तीत जास्त लोकांची भरती करा. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अनादर सहन केला जाणार नाही. एअरटेलनेदेखील त्या मुलीच्यावतीने तमाम मराठी भाषिकांची माफी मागितली पाहिजे,” असे आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे. “एअरटेल गॅलेरीमधला उद्दाम आणि उध्दटपणा समोर आला आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा अनादर सहन केला जाणार नाही एअरटेलने देखील त्या मुलीच्या वतीने तमाम मराठी भाषिकांची माफी मागावी…. @airtelindia” अशी पोस्टही चित्रा वाघ यांनी केली आहे.

एअरटेल गॅलरीत काय घडले?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुणी मराठी तरुणाला महाराष्ट्रात मराठी येणे महत्त्वाचे नाही, असे म्हणत हुज्जत घालत आहे. ‘क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है’, भारतात कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो, असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली.