Homeमहामुंबईनवी मुंबईCIDCO : सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यात मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख

CIDCO : सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यात मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख

Subscribe

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत सिडकोने एकूण 26 हजार विक्रीसाठी काढलेले आहे. सिडकोने ऑक्टोबर महिन्यात या घरांसाठी नोंदणी सुरू केली होती. त्यानंतर आतापर्यंत तीन वेळा या घरांसाठी अर्ज करण्याच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली. पण आता चौथ्यांदा सुद्धा अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे.

नवी मुंबई : ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेअंतर्गत सिडकोने एकूण 26 हजार विक्रीसाठी काढलेले आहे. सिडकोने ऑक्टोबर महिन्यात या घरांसाठी नोंदणी सुरू केली होती. त्यानंतर आतापर्यंत तीन वेळा या घरांसाठी अर्ज करण्याच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली. पण आता चौथ्यांदा हे अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली असून इच्छुक नागरिक 25 जानेवारीपर्यंत सिडकोच्या घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत. 10 जानेवारी 2025 ही अर्जासाठी शेवटची तारीख होती. सिडको नवी मुंबईतील विविध भागात 67 हजार घरांची निर्मिती करत आहे. यातील 26000 घरे ही “माझे पसंतीचे सिडको घर” या योजनेअंतर्गत विकली जाणार आहेत. यासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. (CIDCO Extension of time to apply for houses)

सिडकोतर्फे “माझे पसंतीचे सिडको घर” या महागृहनिर्माण योजनेंतर्गत 26 हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असणार आहेत. ही घरे नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये आहेत. या घरांसाठी आतापर्यंत हजारो इच्छुकांनी अर्ज केले आहेत. आत्तापर्यंत जवळपास 55 हजार अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता दिलेली ही मुदतवाढ शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, अर्जदारांना 26 जानेवारी पर्यंत प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे.

हेही वाचा… Marriage Auspicious Time : लगीनघाई करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात मुहूर्तांची रीघ

सिडकोच्या घरांच्या किमती…

सिडकोने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील 26 हजार घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटक या गटातील घरांसाठी 25 ते 48 लाखांपर्यंत किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, अत्यल्प म्हणजे LIG गटातील घरांसाठी 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.

गट EWS (आर्थिक दुर्बल घटक)

  • तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
  • तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
  • खारघर बस डेपो – 48. 3 लाख
  • बामणडोंगरी -31. 9 लाख
  • खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
  • कळंबोली बस डेपो – 41.9 लाख

अल्प उत्पन्न गट एलआयजी

  • पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
  • खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
  • तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
  • मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
  • खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
  • वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
  • खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख