HomeमहामुंबईमुंबईMumbai Air Pollution : एक आई म्हणून मी विनंती करते, दिया मिर्झाने...

Mumbai Air Pollution : एक आई म्हणून मी विनंती करते, दिया मिर्झाने मुख्यमंत्र्यांकडे मांडली व्यथा

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना श्वसनाला त्रास होण्याची समस्या जाणवू लागली आहे. याचपार्श्वभूमीवर अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही मुंबईतील प्रदूषणाबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना श्वसनाला त्रास होण्याची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषण कमी करणे आणि मुंबईतील हवा निरोगी ठेवणे हे मोठे आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. याचपार्श्वभूमीवर अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही मुंबईतील प्रदूषणाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील प्रदूषणावर तातडीनं लक्ष द्यावे, अशी विनंती केली आहे. सध्या दिया मिर्झाने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून वाढत्या प्रदूषणाबद्दल चर्चा होताना दिसत आहे. (Dia Mirza expresses concern over Mumbai pollution and shares her woes with Devendra Fadnavis)

दिया मिर्झाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरील पोस्टमध्ये टॅग करत प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने म्हटले की, मुंबई आणि महाराष्ट्रातील वायू प्रदूषणामुळे आमच्या लेकरांच्या फुफ्फुसांवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे एक आई म्हणून मी विनंती करते की, तातडीनं या मुद्द्यावर लक्ष द्या, अशी विनंती दिया मिर्झाने केली आहे. तसेच तिने ही पोस्ट शेअर करताना मुंबई आणि उपनगरातील हवामनाची गुणवत्ता देखील निदर्शनास आणून दिली आहे. दिया मिर्झाच्या पोस्टमध्ये शहरातील हवेचा AQI किती घसरला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. दिया मिर्झाच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता दिया मिर्झाच्या पोस्टची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी काही आदेश देतात का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Devendra Fadnavis : दावोसमधील ‘त्या’ चिमुरड्याचा किस्सा सांगत फडणवीस म्हणाले, ‘मी पुन्हा येईन…’

पेट्रोल-डिझेलवरील वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव

दरम्यान, जानेवारीच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःच्या जनहित याचिकेत राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंद करणे शक्य आहे का? याचा अभ्यास करण्यासाठी आणि ते पाहण्यासाठी तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुंबई महानगर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या आणि फक्त इलेक्ट्रिक व कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वाहनांना परवानगी देण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा – Saif Ali Khan : मोहम्मद शरिफुलनेच केला सैफवर हल्ला, अहवालातून आरोपीचे सत्य उघड