HomeमहामुंबईमुंबईDPDC Meeting : मुंबई शहराच्या विकासासाठी 690 कोटींचा आराखडा तयार, डीपीडीसीच्या बैठकीत...

DPDC Meeting : मुंबई शहराच्या विकासासाठी 690 कोटींचा आराखडा तयार, डीपीडीसीच्या बैठकीत घेतले हे निर्णय

Subscribe

मुंबई : वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे गुरूवारी (30 जानेवारी) मुंबई शहरचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक झाली. या बैठकीत मुंबई शहरच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 साठी एकूण 690 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाआधीच मुंबई शहरातील विकासकामांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मुंबईकरांचे पायाभूत सोईसंदर्भातील जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यात मदत होणार आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबई शहरचे खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य, लोकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, पोलीस आयुक्त, सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. (DPDC Meeting mumbai under dcm eknath shinde presence)

हेही वाचा : DCM Eknath Shinde : मुंबईकरांचे प्रशस्त घरांचे स्वप्न पूर्ण होणार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?  

मुंबई शहरातील एकूण 11 मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये औषधोपचार, यंत्रसामग्री, रुग्णालयातील वॉर्डचे आधुनिकीकरण, अद्यावतीकरणासाठी 132.47 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील डोंगर उतारा खाली झोपडपट्ट्यांच्या सुरक्षितेसाठी डोंगर उतारा खाली संरक्षण भिंतीची कामे घेण्यात येत आहेत. यासाठी 26.90 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली. शासकीय महाविद्यालयाचा विकास या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील 9 मोठ्या शासकीय महाविद्यालयामध्ये आवश्यकता सोयी सुविधा तसेच एज्युकेशन अपग्रेशनासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास या विभागाअंतर्गत मुंबई शहरातील डेविड ससून डोंगरी उमरखडी येथील बालसुधार गृह इमारतींचे सक्षमीकरण तसेच येथील मैदानांचे सुशोभीकरण व बालक युवकांसाठी इतर क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, यासाठी रुपये 15.20 कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील सर्व अंगणवाडी येथे स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याचे प्रयोजन आहे तसेच अंगणवाड्यांमध्ये आवश्यकता मूलभूत सुविधा साधन साहित्य साधनसामग्री उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी 5.20 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील सर्व कोळीवाड्यांमधील पायाभूत सुविधांची कामे तसेच समुद्रकिनार्‍यावरील जेटीची बांधकामे करण्यासाठी 33.26 कोटीची रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी 8.25 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओपन जिम आणि शैक्षणिक संस्थांतर्गत असलेले खेळाच्या मैदानाचे सपाटीकरणासाठी 5.12 कोटी, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 3.50 कोटी, एशियाटिक लायब्ररीत जुन्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी 0.02 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.