ED Raid : मुंबई : मुंबईतील वक्रांगी टेक्नॉलॉजी या कंपनीचे मालक दिनेश नंदवाना यांच्या अंधेरी येथील परिसरात ईडीचे (ED) पथक छापेमारी करायला गेले असता, नंदवाना यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंधेरी येथील परिसरात ED तपास करत होती. तेव्हाच ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदनानंतर हे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (ed raids tech companys premises in mumbai chairman dies)
वक्रांगी टेक्नॉलॉजीचे दिनेश नंदवाना यांच्या अंधेरी येथील परिसरात ईडीची शोधमोहीम सुरू असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. या कारवाईबाबत ईडीने स्थानिक पोलिसांनाही माहिती दिली होती.
एमआयडीसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांच्याशी वाईट वागल्याची कोणतीही तक्रार नाही. विभागीय पथकाच्या मदतीने ईडीच्या जालंधर पथकाने नंदवाना यांच्यासह अन्य ठिकाणी छापेमारी केली होती. तेव्हाच नंदवाना यांना आरोग्यासंबंधी त्रास सुरू झाला.
हेही वाचा – GBS Disease : सहा वर्षांच्या चिमुरड्याची जीबीएसवर मात, महाराष्ट्रात आतापर्यंत किती मृत्यू
या प्रकरणी कंपनीने बीएसईला एक निवेदन पाठवले आहे. त्यात आमचे प्रमोटर आणि अध्यक्ष दिनेश नंदवाना यांचा वयाच्या 62 व्या वर्षी मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 31 जानेवारी रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. दिनेश नंदवाना हे पहिल्या पिढीचे उद्योजक होते. ज्यांनी सिद्धांताच्या आधारे कंपनीच्या प्रगतीत हातभार लावला. एक साध्या सल्लागार कंपनीपासून ते आज या क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी हा वक्रांगीचा प्रवास त्यांच्याच कारकीर्दीत झाल्याचे यात म्हटले आहे.
हेही वाचा – Pending Dues : आमचे रखडलेले 89 हजार कोटी द्या, अन्यथा काम बंद करू, कोणी दिला सरकारला हा इशारा वाचा –