Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईमुंबईThane News : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण

Thane News : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण

Subscribe

राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी व राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवारी (ता. 9 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे.

मुंबई : राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी व राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवारी (ता. 9 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे दुपारी 1 वाजता या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 8 कर्करोग मोबाईल व्हॅन, 7 ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 क्रमांकांच्या 384 रुग्णवाहिका, 2 सीटी स्कॅन मशीन, 80 डिजिटल हँड हेड एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 6 डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात येणार आहे. (Eknath Shinde will inaugurate various health facilities at Thane District Collectorate)

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने राज्यातील आठ मंडळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण होणार आहे. या सुविधांमुळे राज्यातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याला प्रतापराव गणपतराव जाधव, केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय व राज्य मंत्री, स्वास्थ्य एवं परिवार कल्याण, भारत सरकार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यांच्यासह या कार्यक्रमाला राज्याचे वन मंत्री गणेश रामचंद्र नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्य मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार बाळ्यामामा म्हात्रे विशेष निमंत्रित असून स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा –  Maharashtra Politics : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर अजित पवारांची निवड, शिंदे गट झाला नाराज

या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार रविंद्र चव्हाण, दौलत दरोडा, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार महेश चौगुले, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार किसन कथोरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार रईस शेख, आमदार सुलभा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – Ladki Bahin Yojna : नियमांच्या बाहेरील महिलांचा फायदा निश्चितपणे बंद होईल, काय म्हणाले फडणवीस?