HomeमहामुंबईमुंबईSaif Ali Khan : मोहम्मद शरिफुलनेच केला सैफवर हल्ला, अहवालातून आरोपीचे सत्य...

Saif Ali Khan : मोहम्मद शरिफुलनेच केला सैफवर हल्ला, अहवालातून आरोपीचे सत्य उघड

Subscribe

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी आणि सीसीटीव्हीफुटेजमधील आरोपी वेगळे असल्याची चर्चा रंगली होती. पण पोलिसांच्या ताब्यातील आरोपीबाबतचा एफएसएल रिपोर्ट समोर आला

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी, 16 जानेवारीला त्याच्या राहत्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या व्यक्तीने हल्ला केला. या घटनेत सैफच्या मणक्यात आरोपीने हल्ला केलेल्या चाकूचा तुकडा अडकला. तसेच, त्याच्या मानेला आणि हाताला सुद्धा दुखापत झाली. या घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले. मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 30 वर्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी आणि सीसीटीव्हीफुटेजमधील आरोपी वेगळे असल्याची चर्चा रंगली होती. पण पोलिसांच्या ताब्यातील आरोपीबाबतचा एफएसएल रिपोर्ट समोर आला असून मोहम्मदच सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला आरोपी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (FSL report revealed that Mohammad Shariful attacked Saif Ali Khan)

अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. यानंतर पोलीस चौकशीत आपल्याला फसवले जात असल्याचा आरोपच आरोपी मोहम्मदने केला. आरोपीच्या कुटुंबियांनीही दावा केला की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला व्यक्ती एक नसून आरोपी वेगळाच आहे. यामुळे आरोपीचा चेहरा आणि सीसीटीव्हीत पळताना दिसलेल्या चोराचा चेहरा यांचे फेस रेकग्निशन करण्यात आले. या फेस रेकग्निशनचा अहवाल आता समोर आला असून सीसीटीव्हीमध्ये पळणारा आरोपी हा मोहम्मद शहजाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… Kumbhmela 2025 : ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करणे भोवले, किन्नर आखाड्याने लक्ष्मी त्रिपाठीला आचार्य पदावरून हटवले

सीसीटीव्हीमधील आरोपी आणि पोलिसांच्या ताब्यात असलेला मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद हे एक व्यक्ती नसून दोन वेगवेगळे व्यक्ती असल्याची चर्चा सुरू होती. ज्यानंतर आरोपीची ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्याचे फेशियल रेकग्निशन टेस्ट म्हणजेच FRT करण्यात आले. त्यानंतर आता या टेस्टचा अहवाल समोर आला असून हा तोच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. तर आरोपी मोहम्मद शरिफुलच्या वडिलाने केलेला दावाही खोटा असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. आरोपी मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी असून त्याने घुसखोरी केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. सध्या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरोपी 11 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.