Tuesday, March 18, 2025
HomeमानिनीHoli 2025 : होळी खेळल्यानंतर कपड्यांचे काय करावे ?

Holi 2025 : होळी खेळल्यानंतर कपड्यांचे काय करावे ?

Subscribe

होळी हा रंगांचा आाणि आनंदाचा सण आहे. रंग खेळल्यानंतर कपड्यांची काळजी घेणे देखील खूप महत्तवाचे आहे. रंग खेळल्यानंतर कपडे कायमचे खराब होऊ नयेत यासाठी योग्य पद्धतीने त्यांची साफसफाई करणे गरजेचे आहे. काही रंग पाण्यात सहजपणे निघून जातात, तर काही जिद्दी डाग काहा केल तरी लवकर जात नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने धुतल्यास कपडे परत वापरण्यास योग्य राहू शकतात. आज आपण जाणून घेऊयात होळी खेळल्यानंतर कपड्यांचे काय करावे.

तत्काळ कपडे धुवा

रंग कपड्यांत मुरण्यापूर्वीच शक्य तितक्या लवकर धुणे चांगले आहे. गरम पाण्याचा वापर टाळा. यामागचं कारण म्हणजे ते रंग स्थिर करू शकते. कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.

भिजवून ठेवा

कपड्यांना हलक्या साबणाच्या पाण्यात ३०-६० मिनिटे भिजवून ठेवा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळलेले पाणी प्रभावी ठरू शकते.

डाग काढण्यासाठी उपाय

बेकिंग सोडा हा डाग काढण्यासाठी उत्तम आहे. डागांवर बेकिंग सोडा आणि पाणी लावून हलक्या हाताने चोळा.डागांवर थोडे लिक्विड डिटर्जंट लावून १०-१५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग धुवा.हायड्रोजन पेरॉक्साईड हे पांढऱ्या कपड्यांवर लावल्यास रंग पटकन निघतो.

सूर्यप्रकाशात वाळवा

जर रंग पूर्णपणे निघत नसेल, तर कपडे उन्हात वाळवा. सूर्यप्रकाश नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो.

कपडे पुन्हा वापरायचे असेल

जर तुम्हाला हे कपडे परत वापरायचे असेल आणि रंग निघत नसेल तर “होळी स्पेशल” कपडे म्हणून ठेवा आणि पुढील वर्षी पुन्हा वापरा.जर कपडे खूप खराब झाले असतील, तर ते घरगुती वापरासाठी याचा उपयोग करा.

हेही वाचा :Holi 2025 : सेफ होळीसाठी मुलांना शिकवा या सेफ्टी टिप्स


Edited By : Prachi Manjrekar

Manini