मेष – काही अनुकूलतेमुळे कार्यभाग साधता येईल. प्रत्येक कृती विचारपूर्वक करा. कोणालाही नाराज करू नका.
वृषभ – आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. घाईत निर्णय न घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन – काही चांगल्या गोष्टींचे संकेत मिळतील. वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच सावध राहा.
कर्क – आपली प्रतिमा उजळून निघेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. बौद्धिक क्षेत्राला वाव आहे. प्रकृतीची पथ्ये पाळा.
सिंह -सामाजिक कार्यात नको ते साहस टाळण्याचा प्रयत्न करा. निराश न होता प्रामाणिकपणे कार्य करीत राहा.
कन्या – अनेक क्षेत्रांत प्रगतीची वाटचाल करू शकाल. खेळात प्राविण्य मिळण्याची संधी मिळेल. जागेचे प्रश्न सुटतील.
तुळ – नियोजित उपक्रम सुरू ठेवू शकाल. भागीदारीतील वादविवाद मिटवता येतील. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. अनावश्यक खर्च टाळा.
धनु – आप्तेष्ठांच्या गाठीभेटीचे योग येतील. मानसिक शांतता लाभेल. आपल्या प्रकृतीस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका.
मकर – आपल्या कार्याच्या व्याप्तीचा आलेख उंचावेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. संयमाने प्रश्न सोडवा.
कुंभ – बौद्धिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. दुसर्यांवर अतिविश्वास ठेवू नका.
मीन – कार्यक्षेत्रात पुढे सरकता येईल, मात्र कार्याची गुप्तता पाळणे आवश्यक ठरणार आहे. आपली कार्यशक्ती वाढेल.
Horoscope : गुरुवार 13 मार्च 2025
written By My Mahanagar Team
MUMBAI

संबंधित लेख