(Mah Kumbh 2025) प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या, बुधवारी शेवटचा दिवस आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यानिमित्त आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. अजूनही तिथे गर्दी कायम आहे. जे काही कारणास्तव संगमावर जाऊ शकलेले नाहीत, ते तिथून आणलेले पाणी शिंपडून किंवा घरी असलेल्या पाण्यात मिसळून आंघोळ करून स्वतःचे समाधान करत आहेत. पण, एका महिलेने आपल्या पतीला ऑनलाइन स्नान घडवून, सर्वांनाच थक्क केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Video of online holy dip on Sangam goes viral)
महाकुंभनिमित्त देश आणि जगभरातून अनेक भाविकांसह विविध साधू, साध्वी संगमच्या काठावर येत आहेत. याशिवाय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेते तसेच अनुपम खेर, सोनाली बेंद्रे, प्राजक्ता माळी, प्रवीण तरडे, सौरभ चौगुले, मिलिंद सोमण, रेमो डिसूझा, तमन्ना भाटिया, गुरु रंधावा, पूनम पांडे, हेमा मालिनी, तनिषा मुखर्जी, निमरत कौर आणि इतर सिनेतारे-तारकांनी संगमावर जाऊन स्नान केले.
View this post on Instagram
या पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामवर पोस्ट झालेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या पतीशी फोनवर व्हिडीओ कॉलद्वारे बोलत असल्याचे पाहायला मिळते. बोलत असतानाच ती फोन दोन-तीन वेळा पाण्यात बुडवते. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, “अरे कोणी महाकुंभाला जात असेल तर मला सांगा, मलाही अशाच प्रकारे माझे पाप धुवायचे आहे.” दुसऱ्या एका युझरने लिहिले, “पाप धुण्याचा ही एक नवीन पद्धत आहे.” तर, एकाने त्या पतीचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, “तुमची सर्व पापे धुऊन साफ झाली आहेत.”
हेही वाचा – Justice delayed : खूनप्रकरणातून आरोपीची तब्बल 21 वर्षांनी निर्दोष मुक्तता, काय म्हणाले सुप्रीम कोर्ट